IMPIMP

Maharashtra Politics News | ‘आमचा 19 आकडा कायम राहील, पण…’, ठाकरे गटाने स्पष्टच सांगितलं

by nagesh
Maharashtra Politics News | sanjay raut spoke clearly about seat allocation our number 19 will remain but

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मात्र महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. मविआतील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांकडून समान जागावाटपाची मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर ठाकरे गटाने (Thackeray group) 19 जागा लढवणार असून हा आमचा आकडा कायम असल्याचे (Maharashtra Politics News) सांगितले आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले, लोकसभेच्या 19 जागा जिंकून आम्ही आलो आहोत. त्यातील काही सोडून गेले पण जागावाटप करताना तिन्ही पक्षात समन्वय साधताना काहीठिकाणी तडजोड करावी लागेल, तोडगा काढावा (Maharashtra Politics News) लागेल हे सत्य आहे. तडजोडीचा फायदा भाजपला (BJP) मिळणार नाही. मविआ मजबूत आहे. 19 आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) 19 आकडा कायम ठेवेल. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असंही त्यांनी सांगितलं.

 

आम्ही यादी तयार करत आहोत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची सोमवारी सक्तवसुली संचलनालय
(Directorate of Enforcement) अर्थात ईडीकडून चौकशी (ED Inquiry) होणार आहे.
जयंत पाटील आज ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत.
या पर्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सूचक इशारा दिला आहे.
विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. हे चित्र फारकाळ राहणार नाही.
2024 साली ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आणि किती वेळ बसवायचे,
याच्या याद्या आम्ही लवकरच तयार करु, असा इशारा राऊत यांनी दिला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Maharashtra Politics News | sanjay raut spoke clearly about seat allocation our number 19 will remain but

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून आंबेगावातील सोसायटीमध्ये
गुंडांचा धुडगुस; महिला जखमी

Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी

Ajit Pawar | ‘माझी दारूची भट्टी असली तरी मला सुद्धा टायरमध्ये घाला’, अवैध धंद्यावरुन अजित पवारांनी पोलिसांचे उपटले कान

Related Posts