IMPIMP

Sameer Wankhede | अतिक अहमदसारखं माझ्यासोबत घडू शकतं, समीर वानखेडेंनी केली ‘ही’ मागणी

by nagesh
Sameer Wankhede | an incident like atiq ahmed can happen to me too a serious claim by sameer wankhede

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कॉर्डेलिया ड्रग्स प्रकरणी (Cordelia Drug Case) आर्यन खानला (Aryan Khan) सोडवण्यासाठी 25 कोटींची खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी एनसीबीचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची सध्या सीबीआय चौकशी (CBI Inquiry) सुरु आहे. एकीकडे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आर्यन खान प्रकरणात मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) दिलासा दिला होता तर दुसरीकडे त्यांना त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे.

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दावा केला आहे की, अतिक अहमद सारखा (Atiq Ahmad) माझ्यावर देखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला मुंबई पोलिसांनी विशेष सुरक्षा पुरवावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे. मी सीबीआयच्या चौकशीला सहकार्य करत आहे. माझ्या सुरक्षेबाबत मी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) पत्र लिहिणार आहे. माझ्या सुरक्षेत कमतरता आहे. माझ्या विरोधात खोटी तक्रार असल्याचे त्यांनी सांगितले.

न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना हे प्रकरण कसे आले मला माहिती नाही. मला वारंवार धमक्या येत आहेत. सोशल मीडियावर सातत्याने धमकी दिली जात आहे. अतीक अहमसारखी घटना घडू शकते त्यामुळे मी जे काही आहे त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवणार आहे, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं.

समीर वानखेडे यांनी आर्य़न खान ड्रग्जप्रकरणी (Aryan Khan Drug Case) मुंबई हायकोर्टात रिट पिटीशन दाखल केली होती. याप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते. तसेच आज समीर वानखेडे यांना अटक होणार का हे पहावे लागले.

 

काय आहे प्रकरण?

एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर (International Cruise Terminal)
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफेड्रॉन, 13 ग्रॅम कोकेन,
21 ग्रॅम चरस, एमडीएमच्या 22 गोळ्या आणि 1 लाख 33 हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.
यावेळी एनसीबीने या क्रूझवरुन आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी (Aryan Khan Drugs Case)
ताब्यात घेतले. यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींवर एनसीबीने अमली पदार्थ कायद्यानुसार (Narcotics Act)
गुन्हा दाखल करुन अटक केली होती.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या प्रकरणात आर्यन खान याच्या कुटुंबाकडून 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समीर वानखेडे
यांच्यासह एनसीबी अधिकारी आणि या प्रकरणातला स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी (KP Gosavi) यांच्यावर
करण्यात आला. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये या सर्वांची नावे आहेत.
यानंतर एनसीबीने एसआयटीची (SIT) स्थापना केली. एसआयटी चौकशीत वानखेडे यांच्या बेहिशेबी
मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
यानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली.

Web Title : Sameer Wankhede | an incident like atiq ahmed can happen to me too a
serious claim by sameer wankhede

Related Posts