IMPIMP

Maharashtra Rains | पुढील 3 दिवस कोकण-मराठवाड्यात ‘धो-धो’ पाऊस ! पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह ‘या’ 12 जिल्ह्यांना हाय अलर्ट

by nagesh
Maharashtra Rains | heavy rainfall possible in konkan and marathwada for next 3 days imd give yellow alert to Pune Satara Sangli Kolhapur Ratnagiri Sindhudurg Raigad Latur Solapur Osmanabad Beed and Ahmednagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप (Lakshadweep) आणि कर्नाटक किनारपट्टी (Karnataka coast) परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कडकडाटासह जोरादर पावसाचा (Maharashtra Rains) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. राज्यात काल काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पुणे शहर (Pune city) आणि परिसरात देखील पावसाने हजेरी लावली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

पुढील तीन दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानंतर रविवार पासून राज्यातील पावसाचा (Maharashtra Rains) जोर कमी होण्याची शक्यता आहे.
आज पुण्यासह 12 जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
याठिकाणी पुढील काही तासांत विजांच्या गडगडाटासह (Thunderstorm and lightning) जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या जिल्ह्यांना येलो अलर्ट

 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि अहमदनगर या 12 जिल्ह्यांना आज येलो अलर्ज (Yellow alert) जारी केला आहे.
तसेच मुंबई, ठाणे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत. उद्या पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर,
रायगड आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे.

 

रविवारी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा

 

रविवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होणार आहे. रविवारी राज्यात सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय पुणे, रायगड, सांगील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
दुसरीकडे, गोव्यातील रडार यंत्रणेनं उत्तर कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात तीव्र पावसाच्या ढगांच्या हालचाली नोंदवल्या आहेत.
पुढील 3 ते 4 तासात याठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall possible in konkan and marathwada for next 3 days imd give yellow alert to Pune Satara Sangli Kolhapur Ratnagiri Sindhudurg Raigad Latur Solapur Osmanabad Beed and Ahmednagar

 

हे देखील वाचा :

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘वसुलीचा पैसा अनिल परब, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे जात होता’

Nawab Malik | ‘राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात राहिले नाहीत’, नवाब मलिकांचा राणेंवर हल्लाबोल

Supreme Court | ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जाणून घ्या

 

Related Posts