IMPIMP

Maharashtra Relief And Rehabilitation Department | महाराष्ट्र राज्य – मदत व पुनर्वसन विभाग : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी

by nagesh
Maharashtra Relief & Rehabilitation Department | Rs 1500 crore sanctioned to help farmers affected by incessant rains – Cabinet Decision

सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra Relief & Rehabilitation Department | गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधीत शेतकऱ्यांना (Farmers Affected Due To Rain) 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. (Maharashtra Relief & Rehabilitation Department)

सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता (Maharashtra Cabinet Decision). त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Relief & Rehabilitation Department)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत.
त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार
रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.

Web Title : Maharashtra Relief & Rehabilitation Department | Rs 1500 crore sanctioned to help farmers affected by incessant rains – Cabinet Decision

Related Posts