IMPIMP

ACB Trap News | वन विभागातील क्लास – 1 महिला अधिकार्‍यासह वाहन चालक 60 हजाराच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

by nagesh
ACB Trap News | A class-1 woman officer in the forest department along with a vehicle driver on the ‘radar’ of anti-corruption in the bribery case of 60 thousand

पालघर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक वनसंरक्षक महिला अधिकार्‍यासह (ACB Trap On Lady Officer) वाहन चालकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाने (Anti Corruption Bureau Thane) गुन्हा (FIR) दाखल केला आहे (Palghar ACB Trap). महिला अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap News)

वर्षाराणी राजाराम खरमाटे Varsarani Rajaram Kharmate (40, पद – सहाय्यक वनसंरक्षक, वाडा उपविभाग, वाडा (वर्ग-1) आणि मुरलीधर शांताराम बोडके Muralidhar Shantaram Bodke (58, खाजगी वाहन चालक, रा. वाडा, जि. पालघर) यांच्याविरूध्द गुन्हा (Palghar Bribe Case) दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वृक्षतोड परवाना मागणी पत्रावरून मालकी हक्क / निर्गत दाखला मंजुर करून देण्याच्या मोबदल्यात वर्षाराणी राजाराम खरमाटे आणि मुरलीधर शांताराम बोडके यांनी तक्रारदाराकडे 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Thane Bribe Case). तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. (Thane Crime News)

प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तक्रार पडताळणी करताना वर्षाराणी खरमाटे आणि मुरलीधर बोडके यांनी 60 हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरूध्द गुन्ह दाखल करण्यात आला आहे. (Palghar Crime News)

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande),
अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Additional Superintendent of Police Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप (DySP Navnath Jagtap),
पोलिस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas), पोलिस हवालदार संजय सुतार,
निशा मांजरेकर, नितीन पागधरे, योगेश धारणे, पोलिस अंमलदार सखाराम दोडे आणि स्वाती तारवी यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : ACB Trap News | A class-1 woman officer in the forest department along with a vehicle
driver on the ‘radar’ of anti-corruption in the bribery case of 60 thousand

Related Posts