IMPIMP

Pune Crime News | पोलिस चौकीतच पीएसआयची कॉलर पकडून केली मारहाण; कात्रज पोलीस चौकीतील घटना

'माझा मुलगा पण प्रेसमध्ये आहे, त्याला सांगून तुझी नोकरी घालवते'

by nagesh
Pune Crime News | Pritam Chunnilal Pardeshi beating psi nitin tanaji jadhav in katraj police chowki bharti vidyapeeth police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भांडणाच्या कारणावरुन कात्रज पोलीस चौकीत (Katraj Police Chowki) येऊन तुझी वर्दी उतरवितो, असा दम देऊन पोलीस उपनिरीक्षकाची (Police Sub Inspector (PSI) कॉलर पकडून त्यांना मारहाण (Beating) करुन जखमी करण्याचा प्रकार घडला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidhyapeeth Police Station) प्रितम चुन्नीलाल परदेशी Pritam Chunnilal Pardeshi (रा. कात्रज गांव) व त्याच्या आईला अटक केली आहे. हा प्रकार कात्रज पोलीस चौकीत (Pune Police) सोमवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता घडला.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव PSI Nitin Tanaji Jadhav (वय ३२) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. ३६५/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पांडुरंग माळवे Akshay Pandurang Malve (वय २३, रा. कात्रज)
याच्याबरोबर झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी कात्रज चौकीत आले. मोठमोठ्याने आरडा ओरडा करु लागले.
तेव्हा रात्रपाळी अंमलदार पोलीस हवालदार जाधव (Police Havaldar Jadhav) यांनी त्यांना आरडा ओरडा करु नका असे सांगितले.
त्याचा राग मनात धरुन प्रितम परदेशी याने फिर्यादी यांना ”तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो,

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तु या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ,” अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जोराने ढकलून दिले. त्याची आईने त्यांची शासकीय गणवेशाची कॉलर पकडून ”तुझ्यासारखे बरेच बघीतलेत, तू काय करणार आमचे, माझा मुलगा पण प्रेसमध्ये आहे, त्याला सांगून तुझी नोकरी घालवते,” असे म्हणून शिवीगाळ केली. प्रितम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करुन त्यांना जखमी केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक थोरात (PSI Thorat) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Pritam Chunnilal Pardeshi beating psi nitin tanaji jadhav in
katraj police chowki bharti vidyapeeth police station

Related Posts