IMPIMP

Maharashtra Sadan – Sudan Crisis | महाराष्ट्र सदनाच्या सहकार्य कक्षाद्वारे सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पाच नागरिक मायभूमीत सुखरूप दाखल

by nagesh
Maharashtra Sadan - Sudan Crisis | Five citizens of Maharashtra who were stuck in Sudan have been safely returned to their motherland through the cooperation cell of Maharashtra Sadan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Sadan – Sudan Crisis | सुदानमध्ये आंतरिक संघर्षामुळे अशांततेचे वातावरण असून तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरु केले आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवारी रात्री एका विशेष विमानाने एकूण 360 भारतीय नागरिक दिल्लीत सुखरूप दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश आहे. या पाचपैकी तीन नागरिकांना महाराष्ट्र सदन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून स्वगृही पाठविण्यात आले आहे. (Maharashtra Sadan – Sudan Crisis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

थोडक्यात तपशील
ऑपरेशन कावेरी अंतर्गत विशेष विमान एसवी-3620 जेडाह (सौदी अरब) येथून बुधवारी रात्री इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली येथे दाखल झाले. यामध्ये महाराष्ट्रातील पाच नागरिकांचा समावेश होता. (Maharashtra Sadan – Sudan Crisis)

 

 

महाराष्ट्र सदन सहकार्य कक्ष सुरु
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिल्लीस्थित विविध राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांना मदत कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्रासह अन्य राज्यांचे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 

सुदान मधून दिल्लीत परतणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुखरुप स्वगृही पोहचता यावे, यासाठी महाराष्ट्र सदनाचे प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र सदनाचा सहकार्य कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदनाचे अपर निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार या कक्षाच्या पर्यवेक्षणाची आणि केंद्र शासनासोबत समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.

 

सुदान येथून दिल्लीत दाखल होणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार विमानाद्वारे राज्यातील त्यांच्या घरापासून नजीकच्या गंतव्यस्थळी पोहचविण्यासाठी कक्षाद्वारे समन्वय केला जात आहे. विमानतळाहून नागरिकांना महाराष्ट्र सदनापर्यंतची वाहतूक व्यवस्था तसेच निवास, भोजन व्यवस्था या कक्षामार्फत करण्यात येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Maharashtra Sadan – Sudan Crisis | Five citizens of Maharashtra who were stuck in Sudan have been safely returned to their motherland through the cooperation cell of Maharashtra Sadan

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | ‘नंबर आल्यावर एकमताने…’, अमोल कोल्हेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर जयंत पाटलांनी सांगितली ‘मन की बात’

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नामंतर ‘राजगड’ करावं, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

CM Eknath Shinde | ‘वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत …’, एकनाथ शिंदेचे बोचरे ट्विट

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

 

Related Posts