IMPIMP

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नामंतर ‘राजगड’ करावं, अजित पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

by nagesh
 MLA Shashikant Shinde | 'We want Ajit Pawar to be the Chief Minister, but Sharad Pawar and...', statement of NCP MLA

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं (Velhe Taluka) नामांतरण ‘राजगड’ तालुका असं करावं, त्यासंदर्भातील
प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून (Rajgad Fort) छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) 27 वर्षे शासन चालवलं. त्यामुळे या किल्ल्याशी तमाम नागरिकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण (Rename) हे राजगड (Rajgad Taluka) करण्यात यावं, अशी नागरिकांची तीव्र इच्छा आहे. याबाबत तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींपैकी 58 ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला असल्याचे अजित पवार ( Ajit Pawar) यांनी पत्रात म्हटले आहे.

 

वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा (Torna Fort) असे दोन महत्त्वाचे किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहिले तर किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने होते.
सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले ‘राजगड’ करुन या तालुक्याचे नामकरण राजगड करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी असं अजित पवार यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar wrote letter to cm eknath shinde for demand rename velhe taluka as rajgad

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत …’, एकनाथ शिंदेचे बोचरे ट्विट

ACB Trap News | मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी 18 हजाराची लाच घेणारा डॉक्टर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Abdul Sattar | उद्धवजी… संजय राऊतांच्या मेंदूची तपासणी करुन घ्या, अब्दुल सत्तारांचा सल्ला

 

Related Posts