IMPIMP

Maharashtra School Education Department News | शालेय शिक्षण विभाग : तब्बल 13 वर्षानंतर इयत्ता 5 वी, 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ

by nagesh
Maharashtra School Education Department News | Increase in Scholarship for Class 5th, 8th Students After 13 Years

सरकारसत्ता ऑनलाईन –  Maharashtra School Education Department News | पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ (Scholarship Increase) करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला (Maharashtra Cabinet Meeting) . बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Maharashtra School Education Department News)

उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रति वर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रति वर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच एच आणि संच आय करिता २० हजार पेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवी नंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षात यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल (Maharashtra Cabinet Decision). ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक
शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

Web Title : Maharashtra School Education Department News | Increase in Scholarship for Class 5th,
8th Students After 13 Years

Related Posts