IMPIMP

Maharashtra Revenue Department | महसूल विभाग : चिमूर, शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये

by nagesh
Maharashtra Revenue Department | Additional Collector’s Office at Chimur in Chandrapur District and Shirdi in Ahmednagar District

सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Revenue Department | चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन (Additional Collector Offices at Chimur And Shirdi) करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Maharashtra Revenue Department)

या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी 6 पदे निर्माण करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत. त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागात विभागला गेला आहे. यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते (Maharashtra Cabinet Decision). तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे हे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Revenue Department)

अहमदनगर हा जिल्हा राज्यातला क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित
सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा
निर्णय घेण्यात आला.

Web Title : Maharashtra Revenue Department | Additional Collector’s Office at Chimur in Chandrapur District and Shirdi in Ahmednagar District

Related Posts