IMPIMP

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल, पुण्यात ‘या’ तारखेपासून बसणार उन्हाचा चटका

by nagesh
Maharashtra Temperature | temperature likely to rise in maharashtra including pune from 7 march imd news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Temperature | फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागायला सुरुवात होते. मात्र यंदा फेब्रुवारी (February) महिन्यात किमान तापमान (Maharashtra Temperature) सरासरी पेक्षा कमीच राहीले. परंतु आता भारतात उन्हाचा चटका वाढला आहे. 7 ते 10 मार्च दरम्यान पुण्यासह (Pune) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवस आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात (Maharashtra Temperature) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 7 मार्चपासून राज्यातील हवामान हिवाळ्यातून (Winter) उन्हाळ्यात प्रवेश करेल असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हवामान खात्याने जारी केलेल्या अपडेटनुसार, 3 मार्चनंतर पुण्यासह उत्तर – मध्य महाराष्ट्रामध्ये (North-Central Maharashtra) रात्रीचे तापमान वाढण्याची (Maharashtra Temperature) शक्यता आहे. या आठवड्याच्या तुलनेत 3 मार्चनंतर देशातील बहुतांश भागांत पारा वाढण्याची शक्यता आहे. 4 ते 10 मार्च या कालावधीत कोकणासह (Konkan) राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमान (Minimum Temperature) सरासरी तापमानाजवळ किंवा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे उत्तर – मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात दिवसाचं तापमान वाढलेलं असलं तरी रात्रीचं तापमान सामान्य किंवा किंचित वाढलं आहे.
परंतु 4 मार्च नंतर राज्यात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे वेधशाळेचे (Pune Observatory) शास्त्रज्ञ अनुपम कश्यप (Anupam Kashyap) यांनी सांगितले की,
सकाळच्या तापमानातील किंचीत घट वगळता पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या पश्चिम हिमालयीन प्रदेशावर (Western Himalayan Region) सातत्याने धडकणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbances) किमान तापमानात वाढ होत आहे.
याशिवाय पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मध्य भारतात येणाऱ्या थंडगार वाऱ्यांना अडथळे निर्माण होत आहेत.
त्यामुळे मध्य महाराष्ट्रात तापमान वाढत आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | temperature likely to rise in maharashtra including pune from 7 march imd news

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Empty Stomach-Ghee | सकाळी उपाशी पोटी खा एक चमचा तूप आणि राहा दिर्घकाळ निरोगी

Amol Mitkari | “युक्रेनमध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्युच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान मोदी राजीनामा देण्याचं धाडस दाखवतील का?”

 

Related Posts