IMPIMP

Maharashtra Tiger | महाराष्ट्रातील वाघ देखील समस्यांनी वैतागले, या कारणामुळे जाऊ लागले तेलंगानाच्या जंगलात

by nagesh
Maharashtra Tiger | the number of tigers coming from maharashtra is increasing in telangana

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांगले हरित क्षेत्र आणि जास्त शिकार मिळत असल्याने तेलंगानाच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातून तेलंगानाच्या वनक्षेत्रात जाणाऱ्या वाघांची (Maharashtra Tiger) संख्या वाढली आहे. तेलंगाना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातून तेलंगानात वाघ (Maharashtra Tiger) येण्याची प्रकरणे वाढली आहेत, यामुळे राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तेलंगानातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, चांगले हरित क्षेत्र आणि शिकार मिळणारे क्षेत्र असल्याने कोमाराम भीम आसिफाबाद जिल्ह्याच्या कागजनगर वन विभागात महाराष्ट्राच्या टिपेश्वर तथा ताडोबा (अभयारण्य) तून येणाऱ्या वाघांची संख्या वाढत आहे. यापैकी काही तेलंगानाच्या जंगलातच आपले कायम वास्तव्य करत आहेत.

 

तेलंगानाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले, ते मोठ्या प्रमाणात चारा असलेली मैदाने बनवत असल्याने शाकाहारी प्राणी वाढत आहेत आणि राज्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे. राज्यात कवल टायगर रिझर्व्ह (केटीआर) कॉरिडॉर महाराष्ट्रातील इतर व्याघ्र अभयारण्यांना जोडण्याचा एकमेव मार्ग आहे.

 

तेलंगाना वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले, कॉरिडॉरमधून येणाऱ्या वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. हे एक चांगले वनक्षेत्र आहे आणि ठिपकेदार हरिण, सांबर आणि इतर प्राण्यांसारखी चांगली शिकार येथे मिळते, ज्यामुळे वाघांना राहण्यासाठी उपयुक्त आहे. ताडोबातून सुद्धा वाघ येत आहेत, तिथे संख्या वाढत असल्याने जागेच्या शोधात वाघ कागजनगरकडे येत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अधिकारी म्हणाले, आम्ही प्रवाशी वाघांसाठी एक चांगले उपयुक्त ठिकाण देण्याचा प्रयत्न करत आहोत,
जसे की गवताळ मैदान, पाणवठे. ज्यामुळे त्यांना येथे शिकार सुद्धा मिळते.
आम्ही त्यांना येथे कायस्वरूपी थांबवण्याच्या हेतुने सर्वप्रकारचे प्रयत्न करू.

 

त्यांनी म्हटले की, कॉरिडोरमध्ये सुमारे आठ वाघ दिसले, जे मागील काही वर्षांच्या तुलनेत जास्त आहेत.
काही वाघ येऊन येथेच राहतात आणि काही परत जातात आणि पुन्हा येतात.
मागील पाच-सहा वर्षात आम्ही पाहिले की, आमच्या परिसरात अनेक वाघिनींनी बछड्यांना जन्म दिला आहे.
एतुर्नागाराम, किन्नेरसानी, पकला आणि जवळपासच्या भागातून सुद्धा वाघांची वर्दळ दिसून येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Tiger | the number of tigers coming from maharashtra is increasing in telangana

 

हे देखील वाचा :

Pimpri Chinchwad Voter List | पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत मोठा घोळ; एकाच चेहऱ्याचे 94000 मतदार

Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा

Beed Minor Girl Gang Rape Case | बीड हादरले; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

 

Related Posts