IMPIMP

Pimpri Chinchwad Voter List | पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत मोठा घोळ; एकाच चेहऱ्याचे 94000 मतदार

by nagesh
Pune Voter News | भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत १ जानेवारी २०२३ या

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे आणि जुन्या याद्या सुधारण्याचे काम सध्या राज्यातील सर्वच मतदार संघात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून छायाचित्र मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया (Pimpri Chinchwad Voter List) सुरू आहे. यात नवीन नोंदण्या, मतदार याद्यांत दुरुस्ती आणि तपशीलात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पण यात पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Voter List) आणि भोसरी विधानसभा मतदार संघात सुमारे 94000 मतदार एकाच चेहऱ्याचे असल्याचे उघड झाले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार याद्या देखील दुरुस्त केल्या जात आहेत. एकाच मतदाराचे विविध मतदार याद्यांत नाव असल्याचे देखील भरपूर प्रकार आढळले आहेत. अशा याद्यांचा आणि मतदारांचा शोध घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरासह पुणे जिल्ह्यात असे तब्बल 4 लाख 67 हजार 499 मतदार आढळले आहेत. या प्रक्रियेत एकाच चेहऱ्याचे छायाचित्र असलेले, एकसारखी नावे असलेले मतदार आहेत. त्यांच्या पत्त्यावर जाऊन खातरजमा केली जाणार आहे. त्यामुळे एक नाव मतदार यादीत ठेऊन अन्य नावे वगळली जाणार आहेत.

 

काही लोक स्थलांतर करतात किंवा राहण्याची जागा बदलतात.
अशा वेळी ते लोक नवीन ठिकाणी मतदार नोंदणी करतात आणि मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करतात.
पण, ते आपल्या जुन्या मतदार यादीतील नाव काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करत नाहीत.
त्यामुळे त्यांची नावे दोन वेळा होतात. दोन्ही ठिकाणच्या मतदार याद्यांत ते दिसतात.
अशाच प्रकारातून हा मोठा घोळ झाला आहे. त्यामुळे तो घोळ सुधारण्यासाठी निवडणूक आयोग कामाला लागला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad Voter List | 94 thousand voters with the same face in pimpri chinchwad

 

हे देखील वाचा :

Winter Session -2022 | ‘मलाही धमकी आली होती तेव्हा सरकारने…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात धक्कादायक खुलासा

Beed Minor Girl Gang Rape Case | बीड हादरले; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव

Neena Gupta | बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर नीना गुप्तांनी केलं भाष्य; म्हणाल्या…

 

Related Posts