IMPIMP

Mahavikas Aghadi Protest | सर्व सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ ! महाविकास आघाडीचे पुण्यात आंदोलन (Video)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Mahavikas Aghadi Protest | महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने (Fadnavis-Pawar-Shinde Govt) मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा (Electricity Price Hike) शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे, असे आरोप सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केले आहेत.

सरकारने केलेल्या या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टी (Sharad Pawar NCP), काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena UBT), आम आदमी पार्टी Aam Aadmi Party (AAP) यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक (Power House Chowk), रास्ता पेठ (Rasta Peth Pune) येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar MLA), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap NCP), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी (Mohan Joshi Congress), अभय छाजेड (Abhay Chhajed), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शेखर धावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde Congress) , शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रसिध्दी प्रमुख अमोघ ढमाले, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, मुकुंद किर्दत, अशोक हरनावल, विशाल धनावड़े, कनव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.

उद्योगपतींचे खिसे भरणे हेच सरकारचे धोरण

देशातील जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय वर्गाचं जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच फडणवीस – शिंदे – पवार सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

Anil Parab On Kirit Somaiya | किरीट सोमय्या महाराष्ट्रातले अण्णा हजारे; शिवसेना नेते अनिल परब यांचा टोला

Related Posts