IMPIMP

Anil Parab On Kirit Somaiya | किरीट सोमय्या महाराष्ट्रातले अण्णा हजारे; शिवसेना नेते अनिल परब यांचा टोला

by sachinsitapure

मुंबई: Anil Parab On Kirit Somaiya | भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याची सुपारी घेतली आहे. ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठिशी लागलेले असतात. सोमय्या हे महाराष्ट्रातले तथाकथितअण्णा हजारे आहेत, असा टोला शिवसेना नेते अनिल परब यांनी लगावला.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. कदमांचा घोटाळा बाहेर काढत सर्व पुरावे किरीट सोमय्यांना देणार, हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांन तुरूंगात टाकावे . याप्रकरणी ईडी चौकशी करण्याची मागणीही सोमय्यांनी करावी, असे आव्हान परब यांनी दिले. ते म्हणाले ” आम्ही त्यांना या प्रकरणांचे पुरावे देत आहोत. आम्हाला बघायचंय सोमय्यांची किती ताकद आहे, कदमांच्या विरोधात काय करतात ते पाहूयात. ते या प्रकरणात लक्ष घालतील का, हाच प्रश्न आहे.

खेडच्या रिसॉर्ट प्रकरणात रामदास कदम यांनी फार मोठा पुढाकार घेतला होता. हे बांधकाम चुकीच्या प्रकारे झाले, असे कदम यांनीच सोमय्यांना सांगितले होते. त्यानंतर सोमय्यांनी ते प्रकरण लावून धरले होते. म्हणून परब यांनी किरीट सोमय्या यांच्याकडेच रामदास कदमांची प्रकरणे पाठवत आहोत, असे उपहासाने म्हटले आहे. तुम्हीच आता त्यांची चौकशी करा. यांनी शेण खाल्लेय, तेच दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात. म्हणून आमची इच्छा आहे की सोमय्या यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे, असे परब म्हणाले. तसेच येत्या काळात कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

आजच्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी रामदास कदमांवर कडाडून हल्ला चढवला. रामदास कदम यांनी शासकीय पदाचा वापर करुन गैरव्यवहार केला . स्वत: काचेच्या घरात रहायचं आणि दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारायचं काम रामदास कदम यांनी केलंय. त्यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाला देखील सोडलेलं नाही, आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही अनिल परब यांनी केला. आता काचेची घर कशी फटाफट फुटतील ते बघा, असा इशाराच त्यांनी दिला.

काय म्हणाले अनिल परब ?

रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. त्यांच्या मुलाला प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही. तरीही दिलेलं आहे. पूररेषेच्या आतमध्ये असलेलं बांधकाम महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी घोटाळे केले. असे विविध 12 ते 13 घोटाळे मी येत्या कालावधीत बाहेर काढेन. किरीट सोमय्यांनी याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले.

कदम यांनी स्वत:च्या भावाला देखील सोडलेलं नाही, आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्यांकडे ही सर्व प्रकरणं मी पाठवतं आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करून रामदास कदम यांना आत ( तुरूंगात) पाठवावं, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्याचबरोबर मुंबईतील एसआरए घोटाळे, मुंबईतील भानगडी, प्रदूषण मंडाळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.

Pune Kondhwa Crime | पुणे : अल्पवयीन मुलीचे नराधम बापाकडून लैंगिक शोषण, आरोपीवर गुन्हा दाखल

Related Posts