IMPIMP

Mahesh Manjrekar | दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांना राज्य महिला आयोगाकडून दणका ! आगामी चित्रपटाबाबत खुलासा करण्याच्या सूचना, जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Mahesh Manjrekar | Director actor Mahesh Manjrekar  Maharashtra State Women's Commission! Matter of Upcoming Movie, Learn Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनदिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांच्या ‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर (Nay Varan Bhat Loncha Trailer) प्रकाशित करण्यात आला आहे. या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण (Online Education) घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला असून हे दृश्य या चित्रपटातून (Nay Varan Bhat Loncha) वगळण्यात यावे अशी मागणी होत आहे. याबाबतीत चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची या निर्मितीमागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाकडून लेखी खुलासा करण्याबाबत पत्र पाठविल्याची माहिती आयोगाच्या (Maharashtra State Women’s Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.  ट्रेलर पाहून समाजातील विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर (Social Media) उमटत आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारे तक्रारपत्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झाले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जळजळीत सत्य दाखवण्याच्या नावाखाली स्त्रियांची अवहेलना केल्याचे चित्रपटाच्या ट्रेलर वरून दिसत आहे. त्यासोबतच लहान मुलांच्या बाबतही चुकीची दृश्य दाखविण्यात आली आहेत. त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी आक्षेप नोंदविला आहे (Parents of children seeking online education have objected.) या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक म्हणून या निर्मिती मागची संकल्पना, कथानक आणि दिग्दर्शकीय भूमिका जाणून घेणे उचित वाटते. याप्रकरणी लेखी स्वरूपातील खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार आयोगास तात्काळ पाठविण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

 

Web Title : Mahesh Manjrekar | Director actor Mahesh Manjrekar  Maharashtra State Women’s Commission! Matter of Upcoming Movie, Learn Case

 

हे देखील वाचा :

Coronavirus in India | देशातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गदर 5 टक्क्याहून अधिक; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह 8 राज्यातील परिस्थिती चिंताजनक

Coronavirus | संसदेतील 718 कर्मचारी कोरोनाबाधित; अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान

Coronavirus | कोरोनाचा कहर ! तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सहा केंद्रीय मंत्र्यांसह 40 नेत्यांना संसर्ग

 

Related Posts