IMPIMP

Coronavirus | संसदेतील 718 कर्मचारी कोरोनाबाधित; अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान

by nagesh
Coronavirus | covid 19 cases rise in parliament 718 test positive of corona

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus | कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने पसरू लागला आहे. अनेक निर्बंध लागू केले आहे. दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Union Budget Session 2022) काही दिवसांवर आले आहे. त्यातच संसदेतील (Parliament) शेकडो कर्मचाऱ्यांना (Staff) कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असल्याचे समोर आले आहे. 9 जानेवारीपर्यंत 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र बुधवारी बाधितांची संख्या 700 च्यावर गेली. आकडेवारीत 43 टक्क्यांची वाढ झाली असून बाधितांपैकी बहुतेकांना गेल्या दोन आठवड्यातच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, संसदेत जेवढे बाधित (Coronavirus) आढळले आहेत त्यापैकी राज्यसभेतील 200 कर्मचारी आहेत. तर उर्वरित संसद आणि अन्य विभागातील कर्मचारी असल्याचे समजते. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेने (Rajya Sabha) त्यांच्या एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरून (Work From Home) काम करण्याची परवानगी दिली आहे. तर 50 अधिकारीही घरूनच काम करत आहेत. आशा परिस्थितीतही एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होणे ही चिंताजनक बाब आहे.

 

 

गर्दी टाळण्यासाठी संसदेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाचे वेळापत्रक पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ऑफिसमध्ये हजेरी लावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास सकाळी 10 ते 10.30 दरम्यान कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळेत अडवले जाऊ शकते जेणेकरून प्रवासात तसेच लिफ्ट आणि कॉरिडॉरमध्ये गर्दी होऊ नये,’ असे लोकसभेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन चालवण्यासाठी आम्ही विविध पर्यायांचा शोध घेत आहोत.
या महिन्याच्या अखेरीस कोरोनाची परिस्थिती काय आहे त्यावर अवलंबून आहे.
अधिवेशन चालवण्या संदर्भात 25 किंवा 26 जानेवारीला लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष भेटतील.
वास्तविक 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget Session 2022) सादर केला जातो त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरू व्हायला हवे.
राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आयोजित केले होते.
त्याचबरोबर कोरोनाच्या सद्य परिस्थितीचे मूल्यांकन केले होते.

 

Web Title :-  Coronavirus | covid 19 cases rise in parliament 718 test positive of corona

 

हे देखील वाचा :

Coronavirus | कोरोनाचा कहर ! तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सहा केंद्रीय मंत्र्यांसह 40 नेत्यांना संसर्ग

Pune Fire News | पुण्याच्या शिवणेत 15 वाहने पेटविली; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

Pune Crime | पुण्यात मांजरीला वाचविताना तरुण पडला वेताळ टेकडीवरील खाणीत; अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले सुखरुप बाहेर

 

Related Posts