IMPIMP

Coronavirus in India | देशातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गदर 5 टक्क्याहून अधिक; महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, कर्नाटकसह 8 राज्यातील परिस्थिती चिंताजनक

by nagesh
coronavirus-in-india-infectious-rate-more-5-percent-300-districts-central-government-expressed-concern-covid-19

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने देशात कहर (Coronavirus in India) केला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून देशातील 300 जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर 5 टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्र , पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात या राज्याचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे (Central Health Department) सहसचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबरला कोरोना संसर्गात 1.1 टक्के वाढ झाली. त्याचे हे प्रमाण बुधवारी 11.05 टक्के झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

10 जानेवारीला जगामध्ये 31.59 लाख कोरोनाबाधित (Corona Positive) आढळले. आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा होता. देशातील 19 राज्यांमध्ये प्रत्येकी 10 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. महत्त्वाचे म्हणजे आठ राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून पात्र गटातील सर्व व्यक्तीनी प्राधान्याने लस घेतली पाहिजे. शिवाय कोरोना नियमांचे पालनही केले पाहिजे, असेही केंद्र सरकारने (Central Government) म्हटले आहे. दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) म्हणाले की, ”साधा ताप व खोकला म्हणजे ओमायक्राॅनचा संसर्ग (Omicron) नव्हे. या संसर्गाकडे अधिक गंभीरपणे पाहायला हवे व डॉक्टरांकडून नीट उपचार करून घ्यावेत. तसेच सर्वांनी मास्क वापर करण्याबरोबरच सोशल डिस्टन्स राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.” (Coronavirus in India)

 

स्थिती सुधारल्यास निर्बंध शिथिल होतील – आरोग्यमंत्री

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) म्हणाले की, ”दिल्लीत बाधितांची संख्या स्थिर आहे. यामध्ये आणखी सुधारणा झाली तर निर्बंध शिथिल करण्यात येतील. रविवारी दिल्लीत बाधितांची संख्या 22 हजारांवर पोहोचली होती. मात्र त्यानंतर या आकड्यामध्ये वाढ झाली नाही. सोमवारी 19 हजार 166 तर मंगळवारी 21 हजार 259 कोरोनाबाधित आढळून आले.” या संख्येवरुन बाधितांच्या वाढीचा वेग स्थिर झाल्याचा दावा जैन यांनी केला आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हे देखील वाचा :

Coronavirus | संसदेतील 718 कर्मचारी कोरोनाबाधित; अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आव्हान

Coronavirus | कोरोनाचा कहर ! तीन मुख्यमंत्री, चार उपमुख्यमंत्री, सहा केंद्रीय मंत्र्यांसह 40 नेत्यांना संसर्ग

Pune Fire News | पुण्याच्या शिवणेत 15 वाहने पेटविली; जाणीवपूर्वक आग लावल्याचा नागरिकांना संशय

 

Related Posts