IMPIMP

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश

by nagesh
Mahlunge-Maan Town Planning Scheme | Order of Commissioner of PMRDA to speed up the work of Mhalunge-Man TP Scheme

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Mahlunge-Maan Town Planning Scheme | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) प्रस्तावित करण्यात आलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेला गती (Mahlunge-Maan TP Scheme) देण्याचे आदेश महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी दिले आहेत. या योजनेंतर्गत माण येथील एका खटल्याचा निकाल पीएमआरडीएच्या बाजूने लागल्याने तेथील काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत. (Mahlunge-Maan Town Planning Scheme)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेले राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal) यांनी म्हाळुंगे-माण नगररचना योजनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. महानगर आयुक्त यांचे विशेष कार्य अधिकारी रामदास जगताप, महानगर नियोजनकार डी. एन. पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, कार्यकारी अभियंता शितल देशपांडे, उपमहानगर नियोजनकार गणेश चिल्लाळ, एमआयडीसीचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. (Mahlunge-Maan Town Planning Scheme)

 

महिवाल यांनी हिंजवडी ते मर्सिडीज बेंज कंपनी शोरूमपर्यंत होणाऱ्या ३६ मीटर रुंद रस्त्याची पाहणी केली.
तसेच माण येथील विकास ठाकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने तेथील काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश एमआयडीसीच्या अभियांत्रिकी विभागाला दिले.
याशिवाय नगर रचना योजनेतील १.६ कि.मी. लांब आणि २४ मीटर रुंद रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.
तसेच शेतकरी जमीन धारकांना द्यावयाच्या अंतिम भूखंडाचे केलेले सीमांकन आणि लावलेले नामफलक याची देखील पाहणी केली.
नगररचना योजनेतील उपस्थित काही शेतकऱ्यांशी देखील महिवाल यांनी चर्चा केली.
नदीलगतच्या निळ्या रेषेद्वारे बाधित भूखंडाचे पुर्नवाटपासाठी प्रस्तावित पहिल्या फेरबदल रचना योजनेचा नकाशा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
याबाबत काही सूचना,
हरकती असल्यास ९ सप्टेंबरपर्यंत पीएमआरडीएच्या कार्यालयात समक्ष सादर करण्याचे आवाहन महिवाल यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mahlunge-Maan Town Planning Scheme | Order of Commissioner of PMRDA to speed up the work of Mhalunge-Man TP Scheme

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील एमजी रोडवर होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 22 लाखांचा मुद्देमाल जप्त

Gold Price Today | सोने घसरले, चांदीत किरकोळ चमक, जाणून घ्या सराफा बाजारातील नवे दर

Pune Pimpri Crime | देहूरोड येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बचावासाठी मुलीने केला आरोपीवर चाकू हल्ला

 

Related Posts