IMPIMP

Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

by nagesh
Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | Malojiraje Bhosle of Indapur taluka of Pune district will approve Rs 2 crore for tourism development plan and declare this place as a tourist destination.

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
(Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे आजोबा मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे
जिल्ह्यातील इंदापूर (Indapur, Pune) तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटीं
रुपये मंजूर करण्यात येतील तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात
लोढा यांनी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली. (Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (MLA Dattatray Bharne) यांनी याबाबत विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वास्तव्य केलेला भुईकोट किल्ला (जुनी तहसील कचेरी) हा प्रशासकीय दृष्टीने महसूल विभागाकडे दप्तरी नोंद आहे. (Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha)

महसूल विभागाच्या नोंदीमध्ये मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहशील कचेरी म्हणजेच मालोजी राजांच्या गडीचे संवर्धन करून जुने बुरुज गाव वेस बुधरे यांचे पुनर्जीवन करून या कचेरीच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारावे दुकान साठी तसेच मालोजीराजे यांच्या पादुकासाठीही दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारून, त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्र समोर आणण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे.

 

याविषयी राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून,
या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत दोन कोटी रुपये मंजूर करण्यात येतील.
तसेच दोन महिन्याच्या आत गढीवर सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन हा विषय तडीस नेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
तसेच हे स्थळ सात दिवसाच्या आत पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल या ठिकाणच्या वास्तूची देखभाल
ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील असेही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
यांनी स्पष्ट केले. तसेच या विषयाच्या अनुषंगाने संबधित विभागांची लवकरच बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | Malojiraje Bhosle of Indapur taluka of Pune district will approve Rs 2 crore for tourism development plan and declare this place as a tourist destination.

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली; सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढावा – अजित पवार

Ajit Pawar On Maharashtra Police | राज्यातील पोलीसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले; पोलीसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता, 3 महिन्यात 30 हून अधिक हल्ले (Video)

 

Related Posts