IMPIMP

मनसुख हिरेन प्रकरण : CDR वरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले, म्हणाले…

by pranjalishirish
Mansukh Hiren

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन –  Mansukh Hiren | अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना sachin vaze एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. मनसुख हिरेन(Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआरच्या CDR आधारे वाझेवर आरोप केले होते. आता त्याच सीडीआरवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून फडणवीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. फडणवीसांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शिक्षा करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगण त्याचे कर्तव्य असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. सीडीआर CDR  मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने सीडीआर रॅकेट उघडकीस आणल होते, असे सांगून फडणवीस यांनी गुन्हा केल्याचा आरोप सावंत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.


सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे.
सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही.
कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये.
स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास अन् विनंतीही असल्याचा खोचक टोलाही सावंत यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

Also Read : 

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वत:च्याच जिल्ह्यात संकटात

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक ! भाजपच्या गडाला मोठं भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात

Related Posts