IMPIMP

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

by nagesh
Milind Narvekar | maharashtra political crisis reason why cm eknath shinde decided to increase shivsena uddhav thackeray leader milind narvekar security

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सत्तेत आल्यापासून त्यांनी ठाकरे गट (Thackeray Group) आणि त्यांच्या नेत्यांवर रोष धरला आहे. एकामागे एक ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. मात्र, या सर्वातील मोठा विरोधाभास म्हणजे शिवसेना Shivsena (उद्धव बाळासाहेब ठाकरे – Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाढ का केली असावी, याबाबत राजकीय मंडळीत तर्क वितर्क लावले जात आहेत. मागील काळात मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) भाजप (BJP) किंवा शिंदे गटाच्या (Shinde Group) वाटेवर असल्याचे वृत्त होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे सरकारने मागील काळात संजय राऊत (Sanjay Raut), भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या सुरक्षा काढून घेतल्या होत्या. यातील भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील राहत्या घरावर तर हल्ला देखील झाला होता. पण आता ठाकरे यांचे समर्थक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची सुरक्षा वाढविण्याचे काय कारण?त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटापासून धोका आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नार्वेकरांच्या सुरक्षेत ‘एक्स’ वरुन ‘वाय प्लस’ अशी बढती केली गेली आहे. ही सर्व कामे राज्याची सुरक्षा समिती करत असते.

 

शिंदे यांच्या सरकारकडून कोणत्या नेत्यांना धोके आहेत आणि कोणाला नाहीत, याचा आढावा घेतला जात आहे.
आणि त्यानुसार सुरक्षा देण्यात आणि कमी करण्यात येत आहेत.
मंत्रीपदे नसल्याने भुजबळ, थोरात आणि जाधव यांच्या सुरक्षा काढून घेतल्या गेल्या आहेत.
मात्र संसदीय राजकारणात कोणताही थेट सहभाह नसताना देखील नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यामागील कारणे अस्पष्ट आहेत.

 

मिलिंद नार्वेकर यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले होते.
त्यामुळे ते शिंदे यांच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न तयार झाला होता.
भाजप आमदार आणि वैदकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील ते नाराज असल्याचे रान उठवले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Milind Narvekar | maharashtra political crisis reason why cm eknath shinde decided to increase shivsena uddhav thackeray leader milind narvekar security

 

हे देखील वाचा :

Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही

Sachin Sawant | राज्यांना कमकुवत करुन संपूर्ण देशाला एका रंगात रंगविणे लोकशाहीला घातक – काँग्रेस

 

Related Posts