IMPIMP

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही

by nagesh
BSNL | bsnl has removed its super affordable broadband plans offer from 1 january

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रीपेड युजर्ससाठी बीएसएनएल (BSNL) ने नवीन टॅरिफ ऑफर (Tariff Offer) आणली आहे. नवीन प्लान्स देशभरातील सर्व प्रीपेड युजर्सना (Prepaid Users) लागू असलेल्या विविध लाभांसह येतात. बीएसएनएलने (BSNL) दिवाळी ऑफर 2022 अंतर्गत 1198 आणि 439 रुपयांचे दोन टॅरिफ प्लान्स आणले आहेत. हे दोन प्लान्स दीर्घ वैधतेसह येतात आणि 90 दिवसांपासून 365 दिवसांपर्यंत वैधता मिळते. या प्लानसह, कंपनीने 269 रुपये आणि 739 रुपये किमतीचे दोन गेमिंग आणि मनोरंजन व्हाउचर देखील जाहीर केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

BSNL चा 1198 रु.चा प्लान :
बीएसएनएलच्या 1198 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर 365 दिवसांची म्हणजेच 1 वर्षाची वैधता मिळते. यात ग्राहकांना संपूर्ण महिन्यासाठी 3 जीबी डेटा, 300 मिनिटांचे व्हॉईस कॉलिंग आणि 30 एसएमएस प्रति महिना मिळतील.

 

439 रुपयांचा प्लान :
BSNL च्या 439 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये तीन महिन्यांची वैधता मिळते. म्हणजे दरमहा 150 रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. यात 3 महिन्यांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. यूजर्सना 300 एसएमएसची सुविधा देखील मिळते. यात डेटा फायदा नाही.

 

769 रुपयांचा रिचार्ज प्लान
BSNL चा हा अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सह 90 दिवसांच्या दीर्घ वैधतेसह येतो.
प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा देखील मिळतो. ग्राहकांना प्लानसह मनोरंजन आणि गेमिंग व्हाउचर देखील मिळते.
तसेच गेममध्ये 1 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळते.

 

269 रुपयांचा प्लान
BSNL चा हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतात.
या प्लानसोबत 769 रुपयांच्या प्लानचे सर्व व्हाउचर देखील उपलब्ध आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BSNL | bsnl prepaid diwali plan offers long offers long validity and daily 2 gb data

 

हे देखील वाचा :

Sachin Sawant | राज्यांना कमकुवत करुन संपूर्ण देशाला एका रंगात रंगविणे लोकशाहीला घातक – काँग्रेस

Ashish Shelar | उद्धव ठाकरेंनी लाल बावटा आणि साम्यवाद्यांसोबत जाऊन वैचारीक लोच्या केला आहे – आशिष शेलार

Aditya Thackeray | टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे आक्रमक, एकनाथ शिंदेंवर केला आरोप, म्हणाले – ‘एका माणसाच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र…’

CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

 

Related Posts