IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | आम्ही फक्त प्रश्न सोडवायला असतो, आम्हाला कोणी मते देत नाही – राज ठाकरे

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | beed parli court order present raj thackeray 12 january over st bus case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  –  रॅपिडो बाईक टॅक्सीच्या विरोधात सोमवारी पुण्यातील रिक्षा संघटनांनी ठिय्या आंदोलन केले होते. रॅपिडो बाईक
टॅक्सी अ‍ॅपमुळे आमच्या पोटावर पाय पडला आहे, असे आंदोलक संघटनांचे मत आहे. त्याविरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. अखेर
हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोयते यांनी समिती गठीत करुन मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यावर संघटनांनी तात्पुरता बंद मागे घेतला
आहे. मंगळवारी यांच्यापैकी काही संघटनांनी पुण्यात राज ठाकरेंची (MNS Chief Raj Thackeray) भेट घेत, त्यांनाही निवेदन दिले आहे. राज ठाकरेंनी
(MNS Chief Raj Thackeray) त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पण, राज ठाकरेंनी आपली नेहमीची खंत यावेळी बोलून दाखवली. आम्ही सर्वांचे प्रश्न सोडवतो, पण आम्हाला मते कोणी देत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे आमचे जगणे नको झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले आहेत. तुमचा शब्द कोणी सहसा टाळत नाही. आमचा प्रश्न देखील मार्गी लावावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्याकडे केली आहे.

 

त्यांच्या मागणीवर राज ठाकरे म्हणाले, मी याच्याशी संबंधितांबरोबर बोलत आहे.
मी आज सायंकाळपर्यंत तुम्हाला कळवतो. त्यानंतर प्रतिनिधींनी त्यांचे गाऱ्हाणे पुन्हा एकदा राज ठाकरेंना ऐकविले. त्यावर राज ठाकरे उठत म्हणाले, आम्ही फक्त प्रश्न सोडवायलाच असतो. त्यानंतर बैठकीत एकच हशा पिकला. यापूर्वी देखील राज ठाकरेंनी आम्हाला मते देण्याच्या वेळी अनेकजण आमच्याकडे पाठ फिरवतात, असे म्हंटले होते.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj thackeray witty comment saying we are here to solve problems

 

हे देखील वाचा :

Rakhi Sawant | राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये ड्रामा सुरू; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Anupam Kher | काश्मीर फाइल्सवर झालेल्या टीकेनंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिले ‘हे’ प्रतिउत्तर

Yami Gautam | यामी गौतमचा ‘लॉस्ट’ हा चित्रपट ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

 

Related Posts