IMPIMP

MNS Criticizes Aditya Thackeray | ‘शिल्लक’सेना म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

by nagesh
Aaditya Thackeray | vedanta foxconn project aaditya thackeray on devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMNS Criticizes Aditya Thackeray | बंडखोरीमुळे शिवसेनेची (Shivsena) झालेली वाताहत पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) सध्या आनंदाचे वातावरण आहे. मनसेच्या नेत्यांच्या बोलण्यातून ते सातत्याने समोर येत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) सुद्धा मनसे अधिकृतपणे शिवसेनेची खिल्ली उडवताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पक्ष मजबूत करण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारपासून ‘निष्ठा यात्रा’ काढली आहे. यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना ते भेटी देणार आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी या यात्रेची सुरुवात केली. यावरुनच आता मनसेने आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

 

मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरुन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नियतीचा खेळ ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपलेला पक्ष म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज पक्ष नसलेला माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले ! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये ! शिल्लकसेना. अशाप्रकारची टीका मनसेने (MNS Criticizes Aditya Thackeray) केली आहे.

 

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे…

मंत्री असताना आदित्य ठाकरे मनसेवर टीका करताना म्हणाले होते की, मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे.
पण आता मला बरे वाटत आहे की भाजपाची (BJP) सी टीम म्हणून त्यांना थोडे काम मिळाले आहे.
बी टीम एमआयएम (MIM) आहे आणि सी टीम मनसे आहे.
जो पक्ष गेली इतकी वर्षे आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचे. संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही, असेही आदित्य म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  MNS Criticizes Aditya Thackeray | mns criticizes aditya thackeray over shivsena situation

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांची पतीसाठी खास पोस्ट; नागपूर दौर्‍याचे फोटो शेअर करत म्हणाल्या…

Narayan Rane On Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या बंडाबद्दल विचारताच नारायण राणेंचे मिश्किल भाष्य, म्हणाले…

Pune Crime | घरफोड्या करणार्‍या सराईत चोरट्यांना कोंढवा पोलिसांकडून अटक, 6 लाखाचा माल जप्त

 

Related Posts