IMPIMP

गरीब, वंचितांसाठी मोदी सरकारचं विशेष अभियान ! बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

by omkar
Modi Government | free grain will be available another four months PMGKAY Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana Modi Government

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन –वृत्त संस्था – Ration Card – केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अ‍ॅडवायजरी जारीकरून रेशन कार्ड बनवण्याचे अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. खालच्या स्तरातील अशा लोकांना रेशन कार्ड ( Ration Card ) देऊन त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत आणले जाईल.

केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडेय यांनी सांगितले की, देशात जवळपास दोन कोटी लोकांना नवीन रेशन कार्ड दिले जाऊ शकते. त्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जाणून घ्या 4 जूनचे राशीफळ ! 7 राशींसाठी खास दिवस

कष्टकरी, कामगार, बेघरांना कार्ड

त्यांनी सांगितले की, शहर आणि ग्रामीण गरीब, कचरा वेचणारे, फेरीवाले, रिक्ष चालक, प्रवासी मजूर, बेघर लोक आणि फिरणार्‍या कुटुंबांची रेशन कार्ड बनवली जातील.
कोरोना संसर्गाच्या दरम्यान गरीब, कमजोर आणि वंचित वर्गातील लोकांना रेशन न मिळाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पत्ता नसल्याने या लोकांना रेशन कार्ड बनवता आलेले आलेले नाही.
राज्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी समाजातील खालच्या स्तरातील अशा लोकांसाठी विशेष अभियान राबवून रेशन कार्ड बनवावे.

4.39 कोटी बोगस रेशन कार्ड रद्द करणार

अन्न सचिव पांडेय यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड ( Ration Card) रद्द करून त्याऐवजी नवीन रेशन कार्ड बनवली आहेत.
या प्रक्रियेत समाजातील खालच्या स्तराला प्राथमिकता दिली पाहिजे.
अन्न मंत्रालयाच्या अ‍ॅडवायजरीमध्ये 15 दिवसात रिपोर्ट मागितला आहे.

गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना

कोरोनाच्या दुसरी लाट पाहता केंद्राने गरीब कुटुंबासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना घोषित केली आहे. या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना मे आणि जून महिन्यात प्रति व्यक्ती पाच कि.ग्रॅ. अतिरिक्त अन्न मोफत दिले जात आहे.

Also Read:- 

पुणे महापालिकेत महापौर अन् सभागृहनेते यांच्यात ‘खडाजंगी’ !

‘सीरम’ने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

’तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’…म्हणत माजी आमदाराच्या सुनेवर तुटून पडली मुलगी

मंगलदास बांदल यांच्याविरूध्द आणखी एक फसवणूकीचा गुन्हा, इतरांचा देखील समावेश

50000 ची लाच घेताना उत्पादन शुल्कच्या निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, जाणून घ्या

Coronavirus : अमेरिकन ‘महामारी’ तज्ज्ञ अँथनी फाउची आणि बिल गेट्स यांच्यावर संशय ! चीनी शास्त्रज्ञा सोबत चर्चा? ईमेल ‘लीक’

Related Posts