IMPIMP

Monsoon Weather Update | उष्णतेपासून आराम मिळण्याची शक्यता कमीच; हवामान खात्याचा इशारा

by nagesh
Maharashtra Weather | temperature in the state will rise after february 15

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Monsoon Weather Update | महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण निर्माण झालं. मागील दोन – तीन दिवसापुर्वी अनेक भागात मोसमी पावसाने (Monsoon Weather Update) हजेरी लावली होती. आता मोसमी पाऊस थंडावल्याचे दिसत आहे. अंदमान-केरळ नंतर कर्नाटकात (Karnataka) मोसमी पावसाचं आगमन झालं आहे. दरम्यान तेथून सरकत पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला होता. सध्या मात्र पाऊस रखडला असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर अनेक भागात उष्णतेची लाट पसरली. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता येत्या आठवड्यातही उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिल्लीमध्ये (Delhi) सकाळी कमीतकमी तापमान 28.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहेत. जे सामान्यापेक्षा 1 अंश सेल्सिअस अधिक आहे. हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) काही भागांत उष्णतेच्या (Heat) लाटेचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) इशारा जारी केला होता. कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. शुक्रवारी कमाल तापमान 42.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. (Monsoon Weather Update)

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आयएमडी 4 रंग – आधारित अलर्ट कोड वापरते. हिरवा (कोणत्याही कारवाईची आवश्यकता नाही), पिवळा (लक्ष ठेवा आणि अपडेट रहा), केशरी (तयार राहा) आणि लाल (कृती) यांचा समावेश आहे. जेव्हा अधिकाधिक तापमान 44 अंश सेल्सिअसपेक्षा (Degrees Celsius) जास्त आणि किमान 4.5 अंशापेक्षा अधिक असते तेव्हा उष्णतेची लाट घोषित केली असल्याचं दिसते.

 

Web Title :- Monsoon Weather Update | chances of getting relief from the heat are low imd warning monsoon update news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मालाची वाहतूक केल्यानंतरही पैसे न देता की 63 लाखांची फसवणूक; पी पी बाफना कंपनीचे संचालक प्रफुल्ल बाफना, योगेश बाफनासह 5 जणांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवारांचा गुन्हेगारांना कडक इशारा; म्हणाले – ‘तडीपार करूनही सुधारला नाही तर मोक्का लावू’

Pune Crime | कार-मोटारसायकल अपघातातील वादातून थेट काढले पिस्तुल; कोथरुडमधील भुसारी कॉलनीतील घटनेत खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

 

Related Posts