IMPIMP

Pune Crime | तब्बल 1 किलो सोनं व 3 किलो चांदीचे दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime | Pune Police Crime branch arrests two drug peddlers in Kondhwa seizes Mephedrone worth 7.5 lakhs

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घराच्या बाल्कनीचे ग्रिल वाकवून घरात प्रवेश करुन घरातील एक किलो सोन्याचे व तीन किलो चांदीचे दागिने (Gold and Silver Jewelry) तसेच रोख रक्कम असा एकूण 32 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन (Stealing) नेला होता. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई शनिवारी (दि.2) कोंढवा खडी मशीन चौकात (Kondhwa Khadimshin Chowk) केली.

 

याबाबत प्रविण रमेश कांडपीळ Pravin Ramesh Kandpil (रा. सोवासवेरा अपार्टमेंट, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुश्ताक उर्फ बोना उर्फ पाटी शकील अन्सारी Mushtaq alias Bona alias Pati Shakeel Ansari (वय-34 रा. ग्रिन पार्क शेजारी, कोंढवा) असे अटक (Arrest) केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना 20 जून रोजी घडली होती. फिर्यादी रमेश कांडपीळ हे कुटुंबासह पाळीव कुत्रे खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीचे ग्रिल वाकवून घरात प्रवेश करुन घरातील 32 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला होता. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार मुश्ताक उर्फ बोना अन्सारी हा त्याच्या बहिणीच्या नवऱ्याला भेटण्यासाठी कोंढवा खडी मशीन चौकात येणार आहे. पोलिसांनी (Pune Police) कोंढवा खडी मशीन चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचे फुटेज व फोटो तपासले असता ते मिळते जुळते होते. पोलिसांनी आरोपीकडे बिबवेवाडी येथील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला बिबवेवाडी पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.

 

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पुणे शहरात खडक (Khadak Police Station), वानवडी (Wanwadi Police Station),
कोंढवा (Kondhwa Police Station), मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station)
तसेच हैदराबाद येथील विजयवाडा पोलीस ठाण्यात (Vijayawada Police Station) दिवसा घरफोडी केल्याचे 18 गुन्हे दाखल आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), अजय जाधव (PSI Ajay Jadhav),
पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर,
अय्याज दड्डीकर, महिला पोलीस अंमलदार रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for stealing 1 kg of gold and 3 kg of silver jewelery

 

 

हे देखील वाचा :

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

 

Related Posts