IMPIMP

Multibagger IT Stock | 7000 रुपयांच्या वर पोहचला टाटा ग्रुपचा ‘हा’ स्टॉक, दिला 67000% पेक्षा जास्त रिटर्न

by nagesh
Multibagger IT Stock | tata elxsi share delivered more than 67000 percent return

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger IT Stock | टाटा समूहाच्या एका शेअरने जोरदार रिटर्न दिला आहे. हा शेअर टाटा अलेक्सीचा आहे. टाटा समूहाच्या या मल्टीबॅगर आयटी स्टॉक (Multibagger IT Stock) ने 67,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर गुरुवारी कंपनीच्या शेअरनी 7,000 रुपयांची पातळी ओलांडली. टाटा अलेक्सी शेअरने गेल्या दोन वर्षांत 1,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. त्याच वेळी, या कालावधीत कंपनीचा शेयर 11 पेक्षा जास्त वेळा वाढला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1 लाख रुपये झाले 66.5 कोटी
Tata Alexi चा शेअर 5 एप्रिल 1996 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) वर 10.63 रुपयांच्या पातळीवर होता. 10 मार्च 2022 रोजी कंपनीचा शेअर बीएसईवर 7,072 रुपयांच्या पातळीवर होता. या कालावधीत कंपनीच्या शेअरनी 67,300 टक्के रिटर्न दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 5 एप्रिल 1996 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आता ही रक्कम 66.5 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक आजच्या तारखेनुसार 66 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. (Multibagger IT Stock)

 

2 वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा
Tata Elxsi च्या शेअर्सनी गेल्या 2 वर्षात जबरदस्त रिटर्न दिला आहे. कंपनीच्या शेअरनी 1,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला. 3 एप्रिल 2020 रोजी, Tata Alexi चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 594.05 रुपये होते. 10 मार्च 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 7,072 रुपयांच्या पातळीवर आहेत.

जर एखाद्या व्यक्तीने 3 एप्रिल 2020 रोजी टाटा अलेक्सीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या त्याचे मूल्य 11.90 लाख रुपये झाले असते. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये थेट गुंतवणूक केल्यास 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले असते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

स्टॉकवर बुलिश आहेत मार्केट एक्सपर्ट
Tata Alexi चे मार्केट कॅप 43,900 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2581.20 रुपये आहे. त्याच वेळी, टाटा अलेक्सीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 7949 रुपये आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ अजूनही या मल्टीबॅगर स्टॉकवर बुलिश आहेत.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger IT Stock | tata elxsi share delivered more than 67000 percent return

 

हे देखील वाचा :

Online Driving Licence Renewal | कामाची बातमी ! उरकून घ्या DL संबंधीत ‘हे’ काम, अन्यथा होईल अडचण

IPS Rashmi Shukla | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हायकोर्टाचा दिलासा

Pune Crime | रस्त्याच्या कडेवरील झाडाला धडकून 14 वर्षाच्या वाहनचालकाचा मृत्यू, मुंढवा परिसरातील घटना

 

Related Posts