IMPIMP

Multibagger Stocks | 300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो हा मल्टीबॅगर स्टॉक, 2-3 महिन्यात मिळू शकतो जबरदस्त रिटर्न

by nagesh
Stock Market | grm overseas penny stock has made 5 crore of rs 10 thousand investment know all details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stocks | ‘ला टिम मेटल’ (La Tim Metal) हा 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stocks) पैकी एक आहे. हा स्टॉक 2022 च्या मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत देखील असू शकतो. ला टिम मेटलचे शेअर्स (Metal Stock) यंदाच्या 95 रुपयांवरून आता 180 रुपयांवर पोहोचले आहेत. मेटल स्टॉकने या वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांना जवळपास 90 टक्के रिटर्न दिला आहे. (Share Market Marathi News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चार्ट पॅटर्नवर, या स्मॉल – कॅप मेटल स्टॉक (small – cap metal stock) ने 155 रुपयांच्या वर ब्रेकआऊट दिले आहे आणि कंपनीचे शेअर्स पुढील 2 – 3 महिन्यांत 300 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे शेअर बाजारातील तज्ञांनी सांगितले आहे.

 

तज्ञांचा सल्ला – खरेदी करू शकता कंपनीचे शेअर्स

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की धातूच्या वाढत्या किमती आणि कंपनीचा मजबूत ताळेबंद यामुळे अल्पावधीत ला टिम मेटल (La Tim Metal) च्या शेअर्सच्या आगामी किमतीत तेजी दिसेल. तज्ज्ञ गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या मल्टीबॅगर स्टॉकचा समावेश करण्यास सांगत आहेत. (Multibagger Stocks)

सुमित बगाडिया, चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक (Sumit Bagadiya, Executive Director, Choice Broking) म्हणतात, ला टिम मेटलच्या शेअर्सने रु. 155 पेक्षा जास्त ब्रेकआउट दिला आणि स्मॉल कॅप विभागातील 2022 मधील तेजीतील मल्टीबॅगर शेअरपैकी एक आहे. हा मेटल स्टॉक खरेदी करणे सुरू करू शकता. या स्टॉकचे तात्काळ शॉर्ट टर्म टार्गेट रु 200 – 225 आहे. स्टॉकमध्ये रु. 160 वर स्टॉप लॉस ठेवा.

 

2 – 3 महिन्यांत 300 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो शेअर

आयआयएफएलचे व्हाईस प्रेसिडेंट अनुज गुप्ता (Anuj Gupta, Vice President, IIFL Securities) म्हणतात, ला टिम मेटल अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (La Tim Metal & Industries Limited) तेजीत आहे.
साप्ताहिक चार्टवर आम्हाला चांगल्या व्हॉल्यूमसह कप अँड हँडल ब्रेकआऊट नोटीस केले आहे.
सध्या हा शेअर रु. 180 च्या पातळीवर व्यवहार करत आहे आणि चांगली तेजी येण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, कंपनीच्या शेअरला रु. 150 आणि रु. 107 च्या पातळीवर मजबूत आधार आहे.
गुंतवणूकदार हा शेअर 230 – 260 रुपयांच्या टार्गेटसह खरेदी करू शकतात.
जर हा मल्टीबॅगर स्टॉक 260 रुपयांच्या वर गेला तर तो पुढील 2 – 3 महिन्यांत 300 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | la tim metal shares can go up to 300 rupee mark in next 3 month

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘होळी वर्षातून एकदा येते, मात्र भाजपवाल्यांचा शिमगा दररोज’, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

Heropanti 2 Trailer | बॉलिवूड चित्रपट हिरोपंती 2 मध्ये Tiger Shroff पुन्हा एकदा करणार ‘हिरोपंती’

Pune Crime | टोळक्याचा धुडगुस ! कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण; भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोघांविरूध्द गुन्हा

 

Related Posts