IMPIMP

Mumbai High Court | भाजप नेत्याला हायकोर्टाचा दणका ! आधी 2 लाख भरा मगच सुनावणी घेऊ

by nagesh
Mumbai High Court | Bombay Mumbai high court order to admit student with learning disability in veterinary science and animal husbandry degree course mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court | कोरोनामुळे लॉकडाऊन (Corona Lockdown) लागू करण्यात आला होता त्यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी सरकारी वीज कंपन्यांच्या Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) निधीचा वापर करून वैयक्तिक कामासाठी चार्टर विमानाचा (Charter Flight) वापर केला होता असा आरोप करत भाजपचे नेते विश्वास पाठक (BJP Vishwas Pathak) यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी घेण्यासाठी आधी दोन लाख जमा करा तरच सुनावणी घेऊ अन्यथा याचिका फेटाळू असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळे पाठकांना मोठा दणका बसला आहे.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्य विद्युत महामंडळ व अन्य तीन वीज कंपन्यांना नितीन राऊत यांनी विमानावर केलेला खर्च वसूल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी विश्वास पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
मुख्य न्या. दीपांकर दत्ता (Justice Dipankar Datta) व न्या. मकरंद कर्णिक (Justice Makrand Karnik) यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.
सुनावणीत नितीन राऊत यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल करण्यायोग्य नाही असा युक्तिवाद केला.
त्यावर याचिकाकर्त्यांनी प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी दोन लाख जमा करावेत.
त्यानंतर दोन आठवड्यांनी याचिका पटलावर आणावी. जर रक्कम जमा केली नाही, तर याचिका आपोआप रद्द होईल,
असे न्यायालयाने स्पष्ट केले. (Mumbai High Court)

 

याचिकेतील आरोप
माहिती अधिकारांतर्गत एका व्यक्तीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे विश्वास पाठक यांनी याचिका दाखल केली आहे.
त्यात त्यांनी लॉकडाऊन काळात राऊत यांनी वैयक्तिक कामासाठी मुंबई (Mumbai), नागपूर (Nagpur), हैदराबाद (Hyderabad) व दिल्लीला (Delhi) जाण्यासाठी चार्टरचा वापर केला व वीज कंपन्यांना ४० लाख बिल भरण्यास सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एमएसईबीचे उत्तर
माहिती अधिकाराअंतर्गत वीज वितरण कंपनीने (MSEB) दिलेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या प्रशासकीय कामानिमित्त जून जुलै २०२० मध्ये मंत्र्यांनी नागपूरला चार्टर विमानाने प्रवास केला त्याचे १४.४५ लाख रुपये भरावे लागल्याचे स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Mumbai High Court | pay two lakhs only then take the hearing bjp leader Vishwas Pathak slapped by high court

 

हे देखील वाचा :

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

Pune Police | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकास केले महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी ‘संलग्न’; पोलिस आयुक्त व सह आयुक्तांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

 

Related Posts