IMPIMP

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी

by nagesh
Weight Loss drink | weight loss drink how to reduce belly fat belly fat loss tips

सरकारसत्ता ऑनलाइन – Weight Loss drink | धावपळीच्या या जीवनात लोक लठ्ठ होत चालले आहेत. लठ्ठपणामुळे आपण अनेक गंभीर आजारांना (Serious Illnesses) बळी पडू शकतो. त्यावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास समस्या अधिकच वाढतात. मात्र, लठ्ठपणा (Obesity) आणि वजन कमी करणे हे आव्हानापेक्षा कमी नाही. काही लोक यासाठी जिममध्ये (Gym) खूप घाम गाळतात, तर काही थेट डॉक्टरांकडे जातात. (Weight Loss drink)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या सगळ्या व्यतिरिक्त आपण अशा पेयाची (Weight Loss Drink) माहिती घेवूयात, जे तुम्हाला वजन कमी करण्यात खूप मदत करू शकते.

 

हे आयुर्वेदिक पेय (Ayurvedic Drinks) ओवा आणि जिर्‍यापासून तयार केले जाते. जिरे (Cumin Seeds)आणि ओव्यामध्ये (Ajwain Ova) असे काही घटक आढळतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. आपण काही आठवड्यांत नियमितपणे वजन कमी करू शकता.

 

लठ्ठपणामुळे वाढतो या आजारांचा धोका
सुप्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या मते, लठ्ठपणामुळे हृदयविकार (Heart Disease), उच्च रक्तदाब (Hypertension), युरिक अ‍ॅसिड वाढणे (High Uric Acid Levels) आणि मधुमेह (Diabetes) यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

असे तयार करा ड्रिंक

सर्वप्रथम, एक चमचा जिरे, एक चमचा बडीशेप (Fennel) घ्या.

एक चमचा सोडा (Soda) आणि एक चमचा ओवा घ्या.

नंतर एका भांड्यात 2 ग्लास पाणी उकळवा.

त्यात जिरे, सोडा, बडीशेप आणि ओवा टाका.

चांगले उकळले की त्यात मध (Honey) टाका.

अर्धे झाल्यानंतर हे पेय गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वजन कमी करण्यासाठी कसे प्रभावी आहे जिरे-ओवा
जिर्‍यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी (Anti Inflammatory) आणि अँटीबायोटिक घटक (Antibiotic Ingredients) आढळतात, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यातील घटक कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रित (Cholesterol Level Control) करतात, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो.

 

त्याच वेळी आयर्न (Iron), कॅल्शियम (Calcium), फायबर (Fiber), फॉस्फरस (Phosphorus) व्यतिरिक्त, ओव्यामध्ये इतर अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ओवा हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे, त्याचा वापर वजन कमी करण्यास मदत करतो. यातील घटक मेटाबॉलिज्मची (Metabolism) गती मजबूत करतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss drink | weight loss drink how to reduce belly fat belly fat loss tips

 

हे देखील वाचा :

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

IRCTC Credit Card | रेल्वेने लाँच केले क्रेडिट कार्ड ! तिकिट बुकिंगमध्ये डिस्काऊंटसह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या

Pune Police | …म्हणून पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकास केले महिन्याभरासाठी कंट्रोल रूमशी ‘संलग्न’; पोलिस आयुक्त व सह आयुक्तांच्या कठोर कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले

 

Related Posts