IMPIMP

Mumbai Ice Cream Case | आईस्क्रीममध्ये सापडलेल्या ‘त्या’ बोटाचे गूढ उकललं; DNA चाचणीत महत्वाची माहिती समोर

by sachinsitapure

इंदापूर : Mumbai Ice Cream Case | मुंबईच्या मालाड भागातल्या एका युवकाला आईस्क्रीम खाताना माणसाच्या अंगठ्याचा तुकडा मिळाला. यानंतर युवकाने मालाड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. युवकाने हे आईस्क्रीम डिलिव्हरी ऍप झेप्टोवरून मागवलं होतं. आईस्क्रीममध्ये माणसाचं तुटलेलं बोट सापडल्यामुळे खळबळ माजली होती.

याप्रकरणी आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा अंगठा आईस्क्रीममध्ये होता, त्याबाबत पोलीस तपासात उलगडा झाला आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणात फॉर्च्युन कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. डीएनए रिपोर्टमध्ये हा अंगठा कुणाचा आहे? याबाबतचा खुलासा झाला आहे.

पोलिसांनी सांगितलं की दिवसभरात प्राप्त झालेल्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात बोटाच्या भागाचा डीएनए आणि आइस्क्रीम फॅक्टरीचे कर्मचारी ओंकार पोटे यांचा डीएनए एकच असल्याचे आढळले आहे. इंदापूर कारखान्यात आईस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे यांच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता.

हे बोट मालाडच्या डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये सापडले होते, आईस्क्रीममध्ये मिळालेलं बोट पुण्याच्या फॉर्च्युन कंपनीमध्ये काम करणारा असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर ओमकार पोटेचं आहे. डीएनए रिपोर्टमध्ये हे बोट ओमकार पोटेचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. ११ मे २०२४ ला आईस्क्रीम पॅक करताना ओमकार पोटेच्या उजव्या हाताचं बोट कापलं गेलं होतं आणि हे बोट आईस्क्रीममध्ये पडलं. धक्कादायक बाब म्हणजे स्पॉट मॉनिटरिंग न करता आईस्क्रीम पॅक केलं गेलं.

Related Posts