IMPIMP

Mumbai-Pune Expressway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

रायगड : सरकारसत्ता ऑनलाईन – रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात भीषण अपघात (Mumbai-Pune Expressway Accident) झाला आहे. बस बोरघाट उतरत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या चालकाचा यात जागीच मृत्यू झाला आहे. ही खाजगी बस सिंधुदुर्ग जिल्ह्यात लग्नासाठी गेली होती. कोल्हापूरमार्गे वाशिंदला परतत असताना, बसला मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. अपघातात चालक जागीच ठार झाला असून,
तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
या भीषण अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. या अपघातानंतर देवदूत यंत्रणा, आयआरबी यंत्रणा,
महामार्ग वाहतूक पोलीस आणि खोपोली पोलीस घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. जखमींवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai-Pune Expressway Accident)

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway Accident | accident private bus and container on mumbai pune expressway bus driver was killed on spot raigad khopoli

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान दिले, पण त्यांनी… – आदित्य ठाकरे

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ajit Pawar | ‘केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीस दोघेही हजर होते मग आत्ता गप्प का?’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीस सरकारला सवाल…

 

Related Posts