IMPIMP

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

by nagesh
Bank Rules Change | story bank rules will change from january 1 know what will be the effect on you

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआय आणि पीएनबीसह इतर बँकांनी ग्राहकांना एसएमएसद्वारे नवीन नियमांची (Bank Rules Change) माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बँका १ जानेवारी २०२३ पर्यंत विद्यमान लॉकर ग्राहकांसोबत त्यांच्या लॉकर कराराचे नूतनीकरण करतील. बँक लॉकर करार धोरणानुसार, एखाद्या ग्राहकाला लॉकरचे वाटप करताना, बँक त्या ग्राहकाशी करार करते, त्यानंतर लॉकरची सुविधा प्रदान केली जाते. दोन्ही पक्षांनी सही केलेल्या लॉकर कराराची प्रत लॉकर भाड्याने घेणाऱ्याला त्याचे अधिकार आणि जबाबदाऱ्या जाणून घेण्यासाठी दिली जाते. तर, कराराची मूळ प्रत बँकेच्या शाखेकडेच राहते. (Bank Rules Change)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आरबीआयने म्हटले आहे की बँकांना रिकाम्या लॉकरची यादी आणि लॉकरचा प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल. तसेच, जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी लॉकरचे भाडे एका वेळी आकारण्याचा अधिकार बँकेकडे आहे. उदाहरणार्थ, लॉकरचे भाडे रु. १,५०० असल्यास, इतर देखभाल शुल्क वगळून बँक तुमच्याकडून रु. ४,५०० पेक्षा जास्त आकारू शकत नाही.

 

अयोग्य अटी-शर्थी बँका लावू शकणार नाहीत
रिझव्‍‌र्ह बँकेच्या सुधारित निर्देश सूचनेनुसार, बँकांनी त्यांच्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अयोग्य अटी किंवा शर्ती टाकू नयेत. अनेकवेळा बँका अटींचा हवाला देऊन आपली जबाबदारी टाळतात म्हणून आरबीआयने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे केले आहे. बँकेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कराराच्या अटी आवश्यकतेपेक्षा जास्त कठीण नसतील. (Bank Rules Change)

 

शुल्कामध्ये सुद्धा बदल
एसबीआयनुसार, बँक लॉकरचे शुल्क क्षेत्रफळ आणि लॉकरच्या आकारानुसार ५०० ते ३,००० रुपयांपर्यंत असते. मोठी शहरे आणि महानगरांमधील बँका लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी २,००० रुपये, ४,००० रुपये, ८,००० रुपये आणि १२,००० रुपये वार्षिक आकारतात. निमशहरी आणि ग्रामीण भागात, बँक लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी रु. १,५००, रु. ३,०००, रु. ६,००० आणि रु. ९,००० आकारतात.

एसएमएस आणि ईमेलद्वारे माहिती देणे बंधनकारक
लॉकर अनधिकृतपणे उघडण्याच्या बाबतीत, बँकांनी दिवस संपण्यापूर्वी ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल ई-मेलवर तारीख, वेळ आणि आवश्यक पावले उचलण्याची माहिती देणे बंधनकारक असेल. आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही म्हटले आहे की प्रत्येक ग्राहकाला लॉकरच्या नवीन व्यवस्थेबद्दल एसएमएसद्वारे माहिती देणे बंधनकारक आहे जेणेकरून ग्राहकांना आगाऊ माहिती असेल. याशिवाय, जेव्हा तुम्ही लॉकरचा वापर कराल तेव्हा तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सामान खराब झाल्यास बँक जबाबदार
सर्वसाधारणपणे, लॉकरमध्ये ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीला बँक जबाबदार नाही, असे सांगून अनेकदा चोरीच्या घटनांमध्ये बँका हात वर करतात. बँकांनी जबाबदारी नाकारल्याने ग्राहकांना कायदेशीर लढाई लढावी लागते.
जानेवारी २०२२ नंतर, बँक लॉकरमधून सामानाचे नुकसान झाल्यास बँका त्यांच्या दायित्वातून सुटू शकणार नाहीत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन मानकानुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरच्या कोणत्याही वस्तूंचे
नुकसान झाल्यास, बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल.

आरबीआयच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, येथील सुरक्षा लक्षात घेऊन सर्व पावले उचलणे ही
बँकांची जबाबदारी आहे. नोटिफिकेशननुसार, बँकेतील कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणामुळे आग, चोरी,
दरोडा यासारख्या घटना घडू नयेत याची काळजी घेणे ही बँकांची जबाबदारी आहे.

 

हे बदलही झाले

– नवीन नियमांनुसार, लॉकरच्या मालकाने एखाद्याला नॉमिनी बनवले तर बँकांना त्याला वस्तू काढण्याची परवानगी द्यावी लागेल.

– भूकंप, पूर, वादळ इत्यादी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील सामानाचे नुकसान झाल्यास, बँक त्याची भरपाई करण्यास जबाबदार राहणार नाही.

– ग्राहकाच्या स्वत:च्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नुकसान झाले तर बँका ग्राहकांना पैसे देणार नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bank Rules Change | story bank rules will change from january 1 know what will be the effect on you

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीस दोघेही हजर होते मग आत्ता गप्प का?’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीस सरकारला सवाल…

Pune News | शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

FIFA World Cup 2022 | मेस्सीने फायनलमध्ये रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फुटबॉलपटू

 

Related Posts