IMPIMP

Mumbai Pune Expressway Accident | ‘तो’ अपघात नव्हे ! 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? पोलीस तपासातुन ‘पर्दाफाश’

by nagesh
Mumbai Pune Expressway Accident | pune man killed over extra marital affair on mumbai pune expressway shown as accident

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका टेम्पोला आग लागली होती. यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत शंका उपस्थितीत करण्यात आल्याने याची सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हा अपघात (Mumbai Pune Expressway Accident) नसून घातपात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आगीत होरपळून मृत्यू (death) झालेल्या व्यक्तीला अनैतिक संबंधातून (immoral relationship) जाळण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रसायनी पोलिसांनी (Rasayani Police Station) दोघांना अटक केली आहे. तर एकजण फरार झाला आहे.

 

सदाशिव संभाजी चिकाळे Sadashiv Sambhaji Chikale (रा. पुनावळे, मुळशी) असे जाळून मारण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल जवळील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री (Mumbai Pune Expressway Accident) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला आग लागून यामध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी मृत व्यक्तीची ओळख पडली नसल्याने पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाचा शोध घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटवली होती.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

या घटनेमबाबत सदाशिव चिकाळे यांच्या कुटुंबाला कळवल्यानंतर त्यांनी संशय व्यक्त करत घातपात (Murder) झाल्याचे सांगितले. नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. या मार्गावरील घटनास्थळापर्यंतची सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी एक संशयित कार त्या टेम्पोचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. त्या रात्री सदाशिव भिवंडीमधून टेम्पोमधून माल घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता हे निष्पन्न झाले.

 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे (Police Inspector Kailas Dongre)
यांनी सहायक पोलीस निरीक्षक बालवडकर (API Balwadkar), पोलीस उपनिरीक्षक काळे (PSI Kale), पोलीस नाईक विशाल झावरे,
मंगेश लांगे, राहुल भडाळे यांची दोन पथके तयार करुन तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार सदाशिवच्या घरच्यांनी ज्यांच्यावर संशय व्यक्त केला होता,
त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले. परंतु ती व्यक्ती अपघाताच्या घटनेनंतर बेपत्ता झाल्याने पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशनवरुन माग काढला.
त्याच्या एका साथीदाराला देहूमधून अटक केली. याप्रकरणात आणखी दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला असता हा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरुन झाल्याचे उघडकीस आले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मयत सदाशिवसोबत आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता.
यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. त्यामुळे आरोपींनी सदाशिवचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
त्यासाठी सदाशिव याच्यावर पाळत ठेवण्यात आली. 12 ऑक्टोबरला सदाशिव भिवंडीहून पुण्याकडे (Bhiwandi to Pune) टेम्पो घेऊन गेला
असल्याची माहिती आरोपींना मिळाली. आरोपीने त्याच्या दोन साथीदारांना घेऊन कारने त्याचा पाठलाग केला.
पनवेल (Panvel) जवळील कळंबोली (Kalamboli) येथे आल्यानंतर एक्सप्रेस वेवर त्यांनी
सदाशिवच्या टेम्पोच्या मागे येऊन रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार टेम्पोला आडवी घालून टेम्पो बाजूला घ्यायला लावले.
यानंतर आरोपींनी सदाशिवला केबीनमध्ये बेदम मारहाण करुन बेशुद्ध केले. यानंतर टेम्पोला आग लावून तिघेजण फरार झाले होते.

 

Web Title :- Mumbai Pune Expressway Accident | pune man killed over extra marital affair on mumbai pune expressway shown as accident

 

हे देखील वाचा :

Pune BJP | भाजपच्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण, सुजाता मारणे प्रथम

Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्याच्या मुळशीत गांजाची शेती; पुणे पोलिसांकडून चौघांवर मोठी कारवाई, 18 किलो गांजा जप्त

 

Related Posts