IMPIMP

Pune Crime | काय सांगता ! होय, पुण्याच्या मुळशीत गांजाची शेती; पुणे पोलिसांकडून चौघांवर मोठी कारवाई, 18 किलो गांजा जप्त

by nagesh
Pune Crime | pimpri chinchwad women policemen were molested in a rickshaw pune crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मुळशी तालुक्यात गांजाची शेती असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला (anti narcotics cell) मिळाली होती. त्यानुसार तपास करुन मुळशी तालुक्यातील आंबेटवेट (Mulshi) गावातील गवळीवाडा येथील एका घरावर छापा टाकला. पोलिसांनी घरातून 18 किलो गांजा जप्त करुन या प्रकरणात चार जणांना अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये शेतात तब्बल 250 गांजाच्या झाडांची लागवड (Pune Crime) केल्याचे समोर आले आहे.

 

साहेबा हुलगप्पा म्हेत्रे (वय-20) चेतन मारुती मोहोळ (वय-27 रा. कोथरुड) यांना पहिल्यांदा सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या
सखोल चौकशी प्रकाश वाघोजी खेडेकर (वय-35) व इंदुबाई खेडेकर (वय-65) यांची नावे समोर आली. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुण्यात (Pune Crime) होत असलेल्या गांजा तस्करीच्या (Cannabis smuggling) पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गांजाची तस्करी करणाऱ्यांची माहिती घेतील जात आहे. याच दरम्यान अमली पदार्थ विरोधी (anti narcotics cell) पथकाचे पोलीस निरक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) यांना हद्दीत गस्त घालत असताना कोथरुड परिसरात दोन जणांकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून चेतन आणि साहेबा या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे अर्धा किलो गांजा सापडला. याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी मुळशी तालुक्यातील आंबेटवेट गावातून गांजा आणल्याची माहिती (Pune Crime) दिली.

 

त्यानुसार पोलिसांनी गावात जाऊन तपास केला असता गवळीवाडा येथील खेडेकर कुटुंबाकडे गांजा असल्याचे समजले.
पोलिसांनी खेडेकर यांच्या घरावर छापा टाकून 18 किलो गांजा जप्त (Cannabis confiscated) केला.
त्यांनी हा गांजा दोघांना विकला होता. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गांजाची शेती दाखवली.
शेतीची पाहणी केल्यानंतर आरोपींनी मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title :- Pune Crime | four arrested for cultivating cannabis in mulshi taluka of pune 18 kg of cannabis was seized from the house of the accused by anti narcotics cell pune

 

हे देखील वाचा :

क्रिप्टोच्या बाजारात CoinSwitch Kuber चा बोलबाला, क्रिप्टो संबंधित सर्व गरजा करत आहे पूर्ण

Pune Crime | 50 हजारांची नुकसान भरपाई न दिल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न; बंडगार्डन पोलिसांनी केली दोघांना अटक

Mumbai Hyderabad Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावित मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

 

Related Posts