IMPIMP

Mutual Fund | ‘या’ फंडने दिला 64.8% चा शानदार रिटर्न ! 10 हजाराची गुंतवणूक झाली 1.57 कोटी रुपयांची, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Mutual Fund SIP | mutual fund sip investor can start investment with 100 rupees monthly many funds makes wealth double triple in last 5 years here experts view

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mutual Fund | तुम्ही सुद्धा म्युच्युअल फंड (Mutual fund) मध्ये गुंतवणुक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची असू शकते. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते तरीही गुंतवणुकदार यास पसंती देतात. मागील एक वर्षात, दोन वर्ष आणि पाच वर्षात म्युच्युअल फंडच्या मल्टी असेट कॅटेगरी (A) ने चांगला रिटर्न गुंतवणुकदारांना दिला आहे. यामध्ये सर्वात जास्त रिटर्न ICICI प्रुडेन्शियल मल्टी असेट फंड (ICICI Prudential Multi Asset Fund) चा होता. एक वर्षात त्याने 64.8% चा, दोन वर्षात 25.68 आणि पाच वर्षात 14.95% चा रिटर्न दिला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

भारतीय शेयर बाजार (Indian Stock Market) सध्या 61 हजाराच्या जवळपास व्यवहार करत आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून यामध्ये खुप चढ-उतार दिसत आहे.
मागील काही महिन्यात बाजारातील जाणकारांनी म्हटले की, असेट अलोकेशनबाबत गुंतवणुकदारांनी सावध राहिले पाहिजे.
अशावेळी मल्टी असेट फंड्स गुंतवणुकदारांसाठी एक चांगला पर्याय घेऊन येतो.

 

जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

 

ब्रिजवॉटर असोसिएटचे फाऊंडर आणि हेड फंड गुंतवणुकदार रे डालियो म्हणतात, सर्वात महत्वाचे हे आहे की, असेट अलोकेशनबाबत तुमच्याकडे संमिश्र रणनिती असावी.
गुंतवणुकदारांचा (Mutual Fund) एक संतुलित, रचनात्मक पोर्टफोलियो असावा.
एक असा पोर्टफोलियो असावा जो वेगवेगळ्या वातावरणात चांगली कामगिरी करेल.
म्हणजे पैसा अनेक सेक्टर आणि अनेक स्टॉकमध्ये गुंतवावा.

 

आकड्यांनुसार, आयसीआयसीआय प्रुडेंशियल मल्टी असेट फंडशिवाय अ‍ॅक्सिसच्या ट्रिपल अ‍ॅडव्हान्टेज फंडने एका वर्षात 41.26% चा रिटर्न दिला आहे.
दोन वर्षात त्याने 22.23% आणि पाच वर्षात 13.34% चा रिटर्न दिला आहे. HDFC मल्टी असेट फंडने एक वर्षात 31.02%, दोन वर्षात 21.01 आणि पाच वर्षात 11.11% चा रिटर्न दिला आहे.
SBI मल्टी असेट फंडने एक वर्षात 22.78%, दोन वर्षात 14.88 आणि पाच वर्षात 9.89% का रिटर्न दिला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गुंतवणुकदार झाले मालामाल

 

आयसीआयसीआय प्रुडेंशियलचा मल्टी असेट फंड 2002 ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात आला होता. त्याची नेट असेट्स व्हॅल्यू म्हणजे NAV सुमारे 39 पट वाढली आहे.
याचा अर्थ हा आहे की, 10 रुपयांची गुंतवणुक 19 वर्षात 390 रुपये झाली.
जर एखाद्याने SIP द्वारे 10 हजार रुपये महिना गुंतवणूक केली असती तर ही रक्कम आता 1.57 कोटी रुपये झाली असती.
तर एकुण गुंतवणूक केवळ 22.8 लाख रुपये राहिली.

 

सप्टेंबर 2021 पर्यत आयसीआयसीआय प्रुडेंशियलच्या स्कीमने 63.6% गुंतवणूक इक्विटीमध्ये केली.
या पोर्टफोलियोच्या टॉप 4 सेक्टरमध्ये ऑटो, पावर, टेलीकॉम आणि मेटल्सचा समावेश आहे.
बाजारातील सध्याच्या वातावरणात ही स्कीम इक्विटीमध्ये 10-80% ची गुंतवणूक करते. तर समान्य वातावरणात ती 65 ते 75% पर्यंत केली जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Mutual Fund | icici prudential multi asset fund give 64 percent return in a year 10 investment become 157 crore

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं’ – चित्रा वाघ

Beed Crime | छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडमध्ये जिल्ह्यात खळबळ

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts