IMPIMP

Chitra Wagh | ‘जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं’ – चित्रा वाघ

by nagesh
Chitra Wagh | chitra wagh reaction to the statement compared with jyotiba phule and chandrakant patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एकाबाजूला एनसीबीकडून (NCB) ड्रग्स तस्करांविरोधात जोरदार कारवाई, आर्यन खानला (Aryan Khan) झालेली अटक आणि दुसऱ्याबाजूला या मुद्यावर जोरदार राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) रोज पत्रकार परिषदेत नवनवीन गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता या प्रकरणामध्ये दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उडी घेतली असून त्यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकरसाठी (Kranti Redkar) खास ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचे विधान केले आहे. त्यावर भाजपचे (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे. समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्राची जनता त्या माफीयाला सोडणार नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करुन क्रांती रेडकरला पाठिंबा दिला आहे.

 

 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, काय जमाना आहे… आर्यन खानच्या
पाठीशी बॉलिवूडसह (Bollywood) सरकार (Government) उभं राहिलं तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे
व त्यांची पत्नी क्रांती रेडकर वर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येते.
क्रांती, महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh tweet in support of actress kranti redkar wife of ncb officer sameer wankhede

 

हे देखील वाचा :

Beed Crime | छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; बीडमध्ये जिल्ह्यात खळबळ

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 126 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

PM Kisan Samman Yojana | मोदी सरकारकडून शेतकर्‍यांना दिवाळीची मोठी भेट ! PM Kisan योजनेची रक्कम दुप्पट होणार?

 

Related Posts