IMPIMP

Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड

by nagesh
 Kolhapur Crime News | 32 year old son went to sleep on the mountain after attacking his parents in the house

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान ग्रामीण भागातील आठवडी बाजारात गुंडानी हातात तलवारी घेऊन आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गुंडानी भर बाजारात तोडफोडसुद्धा केली. शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटांमधील वादातून हि घटना घडली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Nagpur Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
नागपूर जिल्ह्यातल्या कन्हानच्या आठवडी बाजारात अचानक शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास काही जणांनी येऊन तोडफोड करायला सुरुवात केली. यावेळी आरोपींकडे तलवारी देखील होत्या. त्यांनी तलवारी हातात फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. दोन गटाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. (Nagpur Crime News)

 

पुण्यात कोयता गँगची दहशत
अशाच प्रकारे मागच्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे.
या गॅंगमध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
यानंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करून या गॅंगमधील काही जणांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची
दहशत संपवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीदेखील काही ठिकाणी हा प्रकार सुरूच आहे.
यानंतर पुणे पोलिसांनी यावर तोडगा म्हणून एक युक्ती काढली.
यामध्ये यापुढे जर कोणाला कोयता खरेदी करायचा असेल त्याला आधी आपलं आधार कार्ड द्यावं लागणार आहे.
यामुळे बऱ्यापैकी कोयता गॅंगवर जरब बसेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nagpur Crime News | talwar gang terror in nagpur

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुण्यात भीषण अपघातात आई-मुलाचा मृत्यू, महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं

Pune Crime News | अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप यांना धमकी

 

Related Posts