IMPIMP

Nagpur Crime News | ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपी कार चालकाकडून महिलेला मारहाण

by nagesh
Nagpur Crime News | the accused car driver beat up the woman due to a dispute over overtaking

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आपल्या कारला
ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या आरोपी व्यक्तीने भर चौकात ओव्हरटेक करणाऱ्या महिलेला मारहाण केली आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी या व्यक्तीवर संताप व्यक्त केला आहे. (Nagpur Crime News)

 

शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना काल दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. यादरम्यान मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने या व्यक्तीच्या गाडीला ओव्हरटेक केले. हि महिला आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर पीडित महिलादेखील आरोपीशी वाद घालू लागली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यानंतर पीडित महिला आणि आरोपीमधील वाद एवढा वाढला कि आरोपीने या महिलेला भरचौकात मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले.
हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला,
मात्र त्याने महिलेला मारहाण करणे सुरूच ठेवले. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करून पीडित महिलेला आरोपीपासून वाचवले.
या मारहाणीप्रकरणी आरोपींविरोधात जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Nagpur Crime News | the accused car driver beat up the woman due to a dispute over overtaking

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या मारणे आणि जगतापला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक; जगताप पुणे जिल्ह्यातील मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक

Pune Municipal Corporation (PMC) | न्यायालयाचा पुणे महापालिकेला दणका, बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविले; जाणून घ्या प्रकरण

 

 

Related Posts