IMPIMP

Nanar Oil Refinery Project | ‘भाजपचा ‘तो’ नेता 1 नंबरचा दलाल, प्रकल्पासाठी जमिनी हडपल्या, आता पैसे अडकल्यामुळे तडफड’ – खासदार विनायक राऊत

by nagesh
Nanar Oil Refinery Project | Devgad shivsena mp vinayak raut slams bjp leader narayan rane and pramod jathar over nanar oil refinery project in konkan

सिंधुदुर्ग : सरकारसत्ता ऑनलाइन कोकणात नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar Oil Refinery Project) येणार म्हणून भाजपच्या (BJP) प्रमोद जठार (Pramod Jathar) यांनी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर जमिनी विकत घेतल्या होत्या. परंतु आता प्रकल्प बारगळल्यानं त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे हा मोबदला मिळवण्यासाठी त्यांची अजूनही तडफड सुरु आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) यांनी केली आहे. तसेच प्रमोद जठारांच्या दहा पिढ्या गेल्यातरी शिवसेना कोकणात (Konkan) नाणार प्रकल्प (Nanar Oil Refinery Project) होऊ देणार नसल्याचे विनायक राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते देवगड (Devgad) येथील मेळाव्यात बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

यावेळी विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि प्रमोद जठार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. प्रमोद जठार म्हणजे दलालीतला एक नंबरचा माणूस आहे. मला त्याच्या दलालीशी काही देणं घेणं नाही नाणारच्या (Nanar Oil Refinery Project) नावाखाली जठार यांनी मोठ्याप्रमाणात जमिनी हडप केल्या. परंतु प्रकल्प बारगळ्याने आता जमिनीचा मोबदला मिळत म्हणून जठार यांची तडफड सुरु आहे. तुम्ही कितीही नारळ फोडा, मला फरक पडत नाही. माझ्या पाठिशी लोकांचे आशीर्वाद आहेत. तुमची दलाली बुडल्याचं मला दु:ख वाटत नाही. काहीही झाले तरी मी नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.

राणे कुटुंबाचे रंग बदलले
मेळाव्यात बोलताना राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, भाजपमध्ये गेल्यावर राणे कुटुंबीयांनी त्यांचे रंग बदलले. विरोधी पक्षात (opposition) असताना राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत होते. परंतु आता भाजपमध्ये गेल्यापासून त्यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. राणे कुटुंबीयांची ही भूमिका दुटप्पी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा आंदण म्हणून दिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी राणे कुटुंबावर टीकास्त्र सोडले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

पुन्हा रक्तरंजित निवडणुकांना सुरुवात
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे (Sindhudurg District Bank) अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांच्या निकटवर्तीयावर झालेल्या हल्ल्याबाबत भाष्य केले.
सिंधुदुर्गात नारायण राणे आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रक्तरंजित निवडणुकांना सुरुवात झाली आहे.
2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव बदनाम झालं होतं.
आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे पुन्हा दुराचारी लाकांनी हिंसाचाराच्या (Violence) घटना घडवण्याचे काम सुरु केल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

 

Web Title :- Nanar Oil Refinery Project | Devgad shivsena mp vinayak raut slams bjp leader narayan rane and pramod jathar over nanar oil refinery project in konkan

 

हे देखील वाचा :

Ahmednagar Crime | दुदैवी ! ‘शोष’ खड्ड्यात पडून साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यु; नाशिक -पुणे महामार्गावरील घटना

Pune Crime | पुण्याच्या सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या युगलाला मारहाण करुन लुबाडले

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

 

Related Posts