IMPIMP

Narendra Patil | ‘ठाकरे सरकारच्या गंभीर चुकांमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले’ – नरेंद्र पाटील

by nagesh
Narenda Patil | due serious mistakes thackeray government maratha community lost its reservation said narendra patil in pune marathi news policenama

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Narendra Patil | महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने (Thackeray government) गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे. आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण (Reservation for Maratha community) मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केली आहे. यावेळे ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

यावेळी बोलताना नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) घणाघात केला आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सरकारने सुप्रिम कोर्टात (Supreme Court) फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्यायमुर्ती भोसले समितीने (Justice Bhosale Committee) केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते. तर, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने 2018 साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने हाय कोर्टात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टात स्थगिती आली नव्हती. तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. असं पाटील यांनी सांगितले.

तसेच, ठाकरे सरकारने (Thackeray government) योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला.
मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सुप्रिम कोर्टोने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील असं देखील ते म्हणाले. तर, ‘मराठा समाजाच्या कल्याणासाठी भाजपा युती सरकारने सारथी संस्था स्थापन करून होतकरू तरुण तरुणींना करिअरसाठी भरघोस मदत केली होती.
पण ठाकरे सरकारने या संस्थेचे महत्त्व कमी केले आणि संस्थेच्या योजनांना कात्री लावली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

दरम्यान, पुढे ते म्हणाले, भाजपा (BJP) युती सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करून
मराठा समाजातील तरूण-तरुणींना भांडवल पुरवठा केला
आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.
आता ठाकरे सरकारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारही ठप्प झाला आहे.
तर, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, निर्वाह भत्ता, शिष्यवृत्ती अशा फडणवीस सरकारच्या योजनाही आता ठप्प झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे सरकारने मराठा समाजाची सर्व प्रकारे फसवणूक केली असून
या सरकारने आणि महाविकास आघाडीने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे, असं देखील नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Narenda Patil | due serious mistakes thackeray government maratha community lost its reservation said narendra patil in pune marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Farm Laws | ‘या’ कारणामुळे PM मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले, नेमकं अन् खरं नेमके कारण आलं समोर

Foreign Liquor Prices | इतर राज्यांतून मद्य आणल्यास कारवाई; परवानगीनंतरच विदेशी मद्याचे दर कमी होणार

Sapna Choudhary | सपना चौधरीनं पुन्हा एकदा सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, डान्सचा ‘हा’ व्हिडीओ झाला व्हायरल

 

Related Posts