IMPIMP

Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा सीबीआय तपास पूर्ण; तपासाचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर

by nagesh
Narendra Dabholkar Murder Case | cbi investigation in dr narendra dabholkar murder case complete report submitted to delhi headquarters

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा (Narendra Dabholkar Murder Case) सीबीआय (CBI) तपास पूर्ण झाला असून त्यासंबंधीचा अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर करण्यात आला. याअगोदरच सीबीआय कडूनदाभोलकर हत्या प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला होता. तसेच याप्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणेकडून नव्याने सुरू करण्यात आलेला तपास देखील पूर्ण झाला असून त्याबाबतचा आहवाल दिल्ली मुख्यालयात सादर करण्यात आला आहे. त्यानुसार आता येत्या तीन आठवड्यात सीबीआय याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करेल. असे एएसजी अनिल सिंह (ASG Anil Singh) यांनी स्पष्ट केले. सीबीआयने दिलेल्या या माहितीची नोंद घेत आरोपींनी दाखल केलेली याचिका न्यायालयाकडून तीन आठवड्यांकरीता तहकूब करण्यात आली. (Narendra Dabholkar Murder Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचे (Narendra Dabholkar Murder Case) आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटला सुरू झाला आहे. ज्यात ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्षही नोंदवून पूर्ण झाली आहे, अशी माहिती अनिल सिंह यांनी कोर्टाला दिली. मात्र यासंदर्भातील याचिका हायकोर्टातही प्रलंबित असल्यानं त्याचा खटल्यावर थेट परिणाम होतोय. तसेच कायद्यानुसार याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयानं देखरेख ठेवण्याची गरज नाही. अशी मागणी या प्रकरणातील दोन आरोपींकडून करण्यात आली आहे. तसेच यासंबंधीची याचिका देखील आरोपींनी हायकोर्टात दाखल केली आहे.

 

आज (दि.३०) न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावेळी, कायद्यानुसार आरोपपत्र दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवू नये, अशी मागणी या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्यावर आपले उत्तर दाखल करत दाभोलकर परिवाराचे वकिल अभय नेवगी यांनी आरोपींच्या मागणीला विरोध दर्शविला. याप्रकरणातील काही आरोपी अद्याप फरार आहेत, हत्येकरीता वापरलेले हत्यार, दुचाकी या गोष्टी अजूनही सापडलेल्या नाहीत. याखेरीज या हत्येमागचे नेमके कारण आणि त्याचे सुत्रधार कोण याचाही शोध लागायचा आहे. त्यामुळे याप्रकरणी हायकोर्टाची देखरेख आवश्यकच असल्याचं त्यांनी यावेळी कोर्टाच्या निदर्शनास आणले.

 

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (Superstition Eradication Committee) संस्थापक कार्याध्यक्ष
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील ओंकारेश्वर पूलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपासावर असमाधान व्यक्त करत दाभोलकर कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
पोलिस या प्रकरणाचा तपास योग्य पध्दतीने करत नसून हायकोर्टाच्या नियंत्रणाखाली केंद्रीय तपासी यंत्रणा सीबीआय मार्फत या प्रकरणाचा तपास करण्यात यावा.
अशी मागणी दाभोलकर कुटुंबियांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रावर सध्या पुणे सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Narendra Dabholkar Murder Case | cbi investigation in dr narendra dabholkar murder case complete report submitted to delhi headquarters

 

हे देखील वाचा :

Navneet Rana | नवनीत राणा यांना न्यायालयाचा दणका!; कोर्टाकडून नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर फरार घोषीत

Pune Pimpri Crime News | तळेगावमध्ये कोयता गँगची दहशत, डोक्यात वार करुन तरुणाला लुटले

Aurangabad Crime News | मावस भावाला व्हिडिओ कॉल करत तरुणाची आत्महत्या; औरंगाबादमधील घटना

 

Related Posts