IMPIMP

तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही का? National Consumer Helpline वर ग्राहक करू शकतात तक्रार; जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
National Consumer Helpline | consumers complain on the national consumer helpline know process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने ग्राहक तक्रार निवारणासाठी National Consumer Helpline पोर्टल सुरू केले आहे. ज्यावर तुम्ही कोणत्याही ग्राहक प्रकरणाची तक्रार, फोन, एसएमएस आणि ऑनलाइन पद्धतीने करू शकता. याशिवाय तुम्ही ग्राहक प्रकरणांची तक्रार NCH चे मोबाइल अ‍ॅप्लीकेशन आणि UMANG मोबाइल अ‍ॅप्लीकेशनद्वारे सुद्धा करू शकता. (National Consumer Helpline)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याद्वारे तुम्ही आपल्या तक्रारीची स्थिती सुद्धा ट्रॅक करू शकता. या पोर्टलवर तक्रारीच्या निवारणाची माहिती सुद्धा मिळेल.

 

National Consumer Helpline पोर्टलबाबत जाणून जाणून घेवूयात –

 

टोल-फ्री नंबरवरून रजिस्टर करू शकता तक्रार –

NCH कडे जर ग्राहक प्रकरणांची तक्रार करायची असेल तर तुम्ही राष्ट्रीय सुट्टी सोडून कधीही सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत टोल-फ्री नंबर 1800-11-4000 वर कॉल करू शकता.
येथे तुमची तक्रार नोंदवली जाईल. जर गरज असेल तर NCH कडून एजंट तुमच्या घरी येऊन तक्रारीसंबंधी कागदपत्र सुद्धा प्राप्त करेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

एसएमएसद्वारे रजिस्टर करू शकता तक्रार

 

याशिवाय तुम्ही एसएमएसद्वारे सुद्धा तक्रार करू शकता.
ज्यासाठी तुम्हाला 8130009809 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

 

ऑनलाईन रजिस्टर करू शकता तक्रार –

 

NCH ची वेबसाइट https://consumerhelpline.gov.in/ वर जावे लागेल. येथे एका पेजवर ऑनलाइन नोंदणी लिहिलेले असेल.
यावर क्लिक करून तुम्ही दुसर्‍या पेजवर जाल. येथे काही माहिती जसे की, नाव, पत्ता आणि ईमेल देऊन अकाऊंट बनवावे लागेल आणि यानंतर सहजपणे लॉगीन करून तक्रार नोंदवू शकता.

 

NCH आणि UMANG च्या अ‍ॅपवर सुद्धा करू शकता तक्रार –

 

गुगल प्ले स्टोअरवरून स्मार्टफोनमध्ये NCH किंवा UMANG चे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल.
यानंतर काही आवश्यक निर्देश पूर्ण करून तक्रार दाखल करू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

तक्रारीची स्थिती ट्रॅक करा –

 

NCH च्या वेबसाइटद्वारे तक्रारीची स्थिती सहज जाणून घेवू शकता. यासाठी एनसीएच्या वेबसाइटवर जा.
येथे होमपेजवर खालच्या बाजूला तक्रारीची स्थिती लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक केल्यावर दुसर्‍या पेजवर जाल.
येथे तक्रार क्रमांक आणि मोबाइल नंबर दिल्यानंतर स्क्रीनवर तक्रारीची स्थिती दिसून येईल.

 

एनसीएचच्या वेबसाइटने होईल हा फायदा –

 

National Consumer Helpline पोर्टलद्वारे तुम्ही आपल्या ग्राहक प्रकरणाची तक्रार घरबसल्या ऑनलाइन करू शकता.
यापूर्वी कोणत्याही ग्राहक प्रकरणाच्या तकारीसाठी कंझ्यूमर डिस्पूट्स रिड्रेसल कमिशनमध्ये जावे लागत होते. यानंतर तुम्हाला कंझ्युमर कोर्टाच्या फेर्‍या माराव्या लागत होत्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : National Consumer Helpline | consumers complain on the national consumer helpline know process

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | …म्हणून राज्यात वाढणार पावसाचा जोर, आगामी 5 दिवस हाय अलर्ट

PMRDA समिती सदस्य निवडणूक ! एकसंघ पद्धतीने भाजप निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता – सभागृह नेते गणेश बिडकर

7th Pay Commission | ‘या’ 2.5 लाख सरकारी नोकरदारांना सुद्धा मिळेल मोठा महागाई भत्ता, मोदी सरकारने दिली भेट

 

Related Posts