IMPIMP

National Lok Adalat Pune | पुणे महापालिकेमध्ये आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 734 प्रकरणे निकाली

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन National Lok Adalat Pune | महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर आज (शनिवारी) पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Corporation) राष्ट्रीय लोक अदालतीचे (National Lok Adalat Pune) आयोजन करण्यात आले. यामध्ये 8 कोटी 64 लाख 77 हजार 106 रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Corporation ) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुणे महानगरपालिका न्यायालयाचे न्यायाधीश ए. बी. तहसीलदार (Judge A. B. Tehsildar), निवृत्त न्यायाधीश व्ही. व्ही. सोनवणे (Judge V. V. Sonavane) यांचे पॅनेल, तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे (Rajendra Muthe), कर आकारणी कर संकलन प्रमुख विलास कानडे (Vilas Kanade), मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण (Nisha Chavan), अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar), विजय लांडगे (Vijay Landage) आदी अधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान, या अदालतीमध्ये पाणीपुरवठा विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून 87 लाख 66 हजार 665 रुपये, मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून 31 लाख 29 हजार 197 रुपये , कर आकारणी व कर संकलन विभागाकडील प्रलंबित प्रकरणां मधून तीन कोटी 68 लाख 53 हजार 964 रुपये, तसेच 3 कोटी 61 लाख 72 हजार 680 रुपये, रक्कम रुपयांचे 14 धनादेश जमा झाले. तसेच परवाना आकाश चिन्ह विभागाकडील प्रलंबित प्रकरणांमधून 15 लाख 08 हजार 800 रुपये रक्कम जमा झाली. तर, या सर्व विभागांकडून 10,624 नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. त्यापैकी आज (शनिवारी) 734 प्रकरणे निकालात काढण्यात आली. (National Lok Adalat Pune)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- National Lok Adalat Pune | 734 cases settled in National People’s Court held in Pune Municipal Corporation

 

हे देखील वाचा :

Life Certificate | UIDAI ने दूर केली पेन्शनर्सची सर्वात मोठी समस्या, घरबसल्या होईल Pension चे हे काम

Bigg Boss 15 | ‘बिग बाॅस 15’च्या सेटवर राखी सावंतच्या पतीने पहिल्यांदाच केलं तिला KISS

PMSBY योजनेत अतिशय कमी प्रीमियममध्ये मिळतो अपघात कव्हरचा लाभ, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे आणि अर्जाची प्रक्रिया

 

Related Posts