IMPIMP

PMSBY योजनेत अतिशय कमी प्रीमियममध्ये मिळतो अपघात कव्हरचा लाभ, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे आणि अर्जाची प्रक्रिया

by nagesh
PMSBY | prime minister suraksha bima yojana give accidental cover at a very low premium in the know the benefits of this government scheme and how to apply

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY) एक दुर्घटना विमा योजना आहे. ही योजना समाजातील गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेत एक वर्षासाठी आकस्मिक मृत्यु आणि अपंगत्व कव्हर प्रदान केले जाते. सोबतच तिचे वार्षिक नूतनीकरण करता येऊ शकते. (PMSBY)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

बचत बँक खाते असलेले 18 ते 70 वर्ष वयाचे लोक या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. दुर्घटनेमुळे होणारा मृत्यू आणि अपंगत्वावर या योजनेत
कव्हर मिळते. मात्र, अर्जदाराने आत्महत्या केल्यास कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळत नाही.

 

कोण घेऊ शकतात लाभ
यामध्ये 18 वर्ष ते 70 वर्ष वयाचा कुणीही व्यक्ती लाभ घेऊ शकतो. 70 वर्षाचे वय ओलांडल्यावर कव्हर संपुष्टात येईल. योजनेसाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. 31 मे दरम्यान प्रीमियम कापण्यासाठी खात्यात बॅलन्स असणे आवश्यक आहे. बँक खाते बंद झाले तर पॉलिसी कॅन्सल होईल.

कसा करावा अर्ज
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (pm bima suraksha yojana) लाभ घेण्यासाठी खातेधारकाला अगोदर त्या बँकेच्या इंटरनेट सुविधेत लॉग-इन करावे लागेल जिथे त्याचे बचत खाते आहे आणि यानंतर योजनेसाठी अर्ज प्रक्रियेचे पालन करावे लागेल. एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट असल्यास केवळ एकाच अकाऊंटद्वारे या विमा योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. वर्षात एकदाच प्रीमियम द्यावा लागतो आणि तो सुद्धा 1 रुपया. तो सुद्धा तुमच्या बँक खात्यातून डिडक्ट होतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

किती द्यावा लागेल प्रीमियम
PMSBY चा वार्षिक प्रीमियम अवघा 12 रुपये आहे म्हणजे दर महिना केवळ 1 रुपयांचा खर्च आहे. दरवर्षी 31 मेपूर्वी तुमच्या बँक खात्यातून प्रीमियमची रक्कम ऑटो डिडक्ट होईल आणि 1 जून ते 31 मेच्या कालावधीसाठी कव्हर मिळेल.

 

Web Title :- PMSBY | prime minister suraksha bima yojana give accidental cover at a very low premium in the know the benefits of this government scheme and how to apply

 

हे देखील वाचा :

Sunny Leone Viral Video | मध्यरात्री भररस्त्यावर लुंगी घालून नाचली सनी लियोनी, व्हिडिओ झाला व्हायरल..!

Bharati Singh | खुशखबर ! सर्वांना हसवणारी काॅमेडियन भारती सिंह देणार सर्वांना ‘गोड’ बातमी

Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या सचिवाच्या गाडीतून रोख रक्कमेसह बॅग चोरीला

 

Related Posts