IMPIMP

Navi Mumbai ACB Trap | ठेकदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा उप कार्यकारी अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

नवी मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बारवी धरण विश्राम गृहाचा उप विभागीय कार्यालयाची साफ सफाई देखभाल करणे इत्यादी कामाच्या बिल मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra State Industrial Development Corporation) उप कार्यकारी अभियंत्याला नवी मुंबई अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने (Navi Mumbai ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.17) दुपारी एकच्या सुमारास अंबरनाथ येथील बारवी धरण विभागाच्या कार्यालयात केली. संजय नाथूराम माने Sanjay Nathuram Mane (वय-55) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या उप कार्यकारी अभियंत्याचे (Deputy Executive Engineer) नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत 29 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टरने नवी मुंबई एसीबीकडे (Navi Mumbai ACB Trap) 14 ऑक्टोबर रोजी तक्रार केली होती. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी बारवी धरण विश्रामगृहाची (Barvi Dam Rest House), उप विभागीय कार्यालयाची साफ सफाई देखभाल करणे इत्यादी कामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले आहे. या टेंडरच्या बिलात कोणतीही त्रुटी न काढता 2 लाख 20 हजार 326 रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी बक्षिस म्हणुन व कॉन्ट्रॅक्टच्या वेळी घेतलेली अनामत रक्कम परत देण्याकरीता संजय माने यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नवी मुंबई एसीबीकडे तक्रार केली.

 

नवी मुंबई एसीबीच्या युनिटने सोमवारी (दि.17) पडताळणी केली असता, बारवी धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता संजय माने
यांनी बिल मंजूर करण्यासाठी आणि अमानत रक्कम देण्यासाठी 50 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य करुन लाच कार्यालयात घेण्याचे कबूल केले.
पथकाने संजय माने यांच्या कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची 50 हजार रुपयांची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले (SP Dr. Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar), नवी मुंबई एसीबी पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख (DySP Jyoti Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे (Police Inspector Shivraj Bendre),
पोलीस हवालदार जाधव, पवार, चालक गायकवाड, पोलीस नाईक ताम्हाणेकर, नाईक, माने, चव्हाण, महिला पोलीस शिपाई चाळके यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Navi Mumbai ACB Trap | Deputy Executive Engineer of State Industrial Development Corporation caught in anti-corruption net while taking bribe of Rs 50 thousand from contractor

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिस्तूल बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Pune Crime | कोंढव्यात 9 लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा गुन्हे शाखेकडून जप्त

 

 

Related Posts