IMPIMP

Nawab Malik | नवाब मलिकांनी दाखवला पुरावा; म्हणाले – ‘सरकारी दस्तावेजसाठी हिंदू?’

by nagesh
Nawab Malik | another forgery nawab malik has now shown death certificate sameer wankhede mother

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Nawab Malik | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मलिक रोज ट्विटद्वारे अनेक कारणास्तव वानखेडे कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप करत आहे. नुकतंच मलिकांनी वानखेडे मुस्लीम असल्याचे सांगत त्यांनी खोट्या कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचे म्हटले. यानंतर आणखी एकदा मलिकांनी समीर वानखेडेंच्या आईंशी संबंधित कागदपत्रे ट्विटरवरुन शेअर केलेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे की, ‘आणखी एक फर्जीवाडा… असे म्हटले आहे.
अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम आणि सरकारी दस्तावेजासाठी हिंदू? धन्य है दाऊद-ज्ञानदेव, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.
मलिक यांनी ट्विटरवरुन झहीदा ज्ञानदेव यांचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र शेअर केले आहे. यातील एक प्रमाणपत्र हे मुंबई महापालिकेचे आहे
तर दुसऱ्या प्रमाणपत्रात झहीदा यांचा उल्लेख हिंदू असा दिसून येतो. परंतु, दोन्ही प्रमाणपत्रावर झहीदा (Zahida) यांच्या पतीचे नाव ज्ञानदेव वानखेडेच (Dnyandev Wankhede) असल्याचं स्पष्ट होतंय.

दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला होता.
कबूल है, ..कबूल है .. कबूल है..यह क्या किया तूने? असे नमूद केले होते. या फोटोमध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लीम वेशात दिसतात.
नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजा करतानाचे फोटो समोर आले होते.
आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे कुटुंबीयातील एका सदस्याकडून खुलासा करण्यात आला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Nawab Malik | another forgery nawab malik has now shown death certificate sameer wankhede mother

 

हे देखील वाचा :

Maharashtra Congress | राज्यात काँग्रेसचा ‘राजस्थान पॅटर्न’? ‘हे’ मंत्री बदलण्याची शक्यता, दिल्लीत खलबदतं सुरू

Life Certificate | पेन्शनर्स ‘या’ 5 पद्धतीने जमा करू शकतात लाईफ सर्टिफिकेट, शिल्लक आहेत केवळ 6 दिवस

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रशासनानं सुरू केली ‘ही’ सुविधा

 

Related Posts