IMPIMP

NCB Officer Amit Gawate | एनसीबीच्या मुंबईतील विभागीय संचालकपदी अमित गवाटे

by nagesh
NCB Officer Amit Gawate | ncb gets sameer wankhedes successor appoints amit gawate as mumbai zonal director

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन NCB Officer Amit Gawate | आर्यन खान प्रकरणामुळे (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचे मुंबईतील माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली झाली होती. तेव्हापासून या पदाचा कार्यभार अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आला होता. मात्र आता विभागीय संचालकपदी आयआरएस अधिकारी (IRS Officer) अमित फक्कड गवाटे (NCB Officer Amit Gawate) यांची निवड करण्यात आली आहे. (The 2008 batch IRS officer Amit Fakkad Gawate appointed as new Zonal Director of NCB Mumbai)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

२००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले अमित गवाटे यांनी बंगळुरूमधील एनसीबीचे विभागीय संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे चेन्नईचा अतिरिक्त प्रभार होता. समीर वानखेडे यांना कार्यकाळ संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली नव्हती. कारण त्यांचा कार्यकाळ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर विभागीय संचालकपदी अमित गवाटे यांची निवड करण्यात आली.

 

समीर वानखेडे यांनी त्यांच्या काळात केलेल्या कारवाया नेहमीच चर्चेचा विषय ठरला होता. मुंबईजवळ एका आलिशान क्रूझवर झालेली कारवाई आणि त्यात आर्यन खान याला झालेली अटक यामुळे मोठा वाद झाला होता. या प्रकरणामुळे अनेक नवीन प्रकरणे समोर आली. त्यांच्यावर लाच मागीतल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवली असेही आरोप केले होते. वानखेडे आणि एनसीबी विरोधात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCB Leader Nawab Malik) यांनी मोठी आघाडी उघडली होती. मलिकांनी केलेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांच्याबरोबर एनसीबीही अडचणीत आली होती.

 

Web Title :- NCB Officer Amit Gawate | ncb gets sameer wankhedes successor appoints amit gawate as mumbai zonal director

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन दर

Raosaheb Danave On Thackeray Government | ‘केंद्र कोळसा देत नसेल तर ठाकरे सरकारने…’; रावसाहेब दानवेंचा सरकारवर निशाणा !

Kirit Somaiya | हायकोर्टाच्या दिलासादायक निर्णयानंतर किरीट सोमय्यांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले…

 

Related Posts